
पुणे! हिंजवडीत IT इंजिनिअर युवतीने चिठ्ठी लिहून 21व्या मजल्यावरुन मारली उडी…
पुणे : हिंजवडी परिसरात आयटी इंजिनिअर युवतीने चिठ्ठी लिहून 21व्या मजल्यावरुन उडी मारून जगाचा निरोप घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. माझी जगायची इच्छा संपली आहे, अशी चिठ्ठी लिहून ठेवली केली. हिंजवडी येथील द क्राऊन ग्रीन सोसायटीमध्ये 31 मे रोजी ही घटना घडली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…
अभिलाषा भाऊसाहेब कोथिंबिरे (वय 25, रा. हिंजवडी) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. अभिलाषा ही हिंजवडी आयटी पार्कमधील एका आयटी कंपनीत नोकरी करत होती. तिची एक मैत्रीण द क्राऊन ग्रीन सोसायटीमध्ये राहत होती. 31 मे रोजी पहाटे ती मैत्रीण राहत असलेल्या सोसायटीत दुचाकीवरून आली. लिफ्टने इमारतीच्या 21 व्या मजल्यावर गेली. तेथून तिने उडी मारून आत्महत्या केली. याबाबत माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सोसायटीच्या पार्किंगमध्ये आढळलेल्या दुचाकीवरून पोलिसांनी अभिलाषा हिची ओळख पटवली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिलाषा घटनेच्या दिवशी पहाटे 4.30 सुमारास दुचाकीने सोसायटीच्या आवारात आली असता लिफ्टने 21 व्या मजल्यावर आपल्या घरी जात पहाटे 4.42 सुमारास तिने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे. अभिलाषाच्या शव विच्छेदन अहवालात तिच्या शरीरावरिल महत्वाच्या अवयवांना गंभीर इजा झाल्याचे म्हटले आहे. या घटनेत कोणत्याही प्रकारचा घातपात अथवा संशयास्पद काही संकेत आढळून आले नसल्याचे म्हटले आहे. प्राथमिक दृष्ट्या तिने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे दिसत आहे. तिच्या खोलीची झाडाझडती घेतली असता तिने लिहिलेले सुसाइट नोट सापडली आहे, त्यावर सॉरी मला माफ करा, मी हे स्वच्छेने करत आहे, माझी आता जगायची इच्छा संपली आहे, असे लिहिलेलं आढळून आले आहे. याबाबत अधिक तपास हिंजवडी पोलिस करत आहेत.
अभिलाषा हिने लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना सापडली. ‘माझी जगायची इच्छा संपली आहे. मी हे स्वतःच्या मर्जीने करत आहे.’ असे चिठ्ठीमध्ये लिहिले आहे. रक्ताचे डाग असलेले नॅपकिन, इनर, उशीचे कव्हर व मोबाइल पोलिसांनी जप्त केले. तिने चिठ्ठीत लिहिलेल्या मजकुराप्रमाणे तिने नैराश्यातून आत्महत्या केली असल्याची शक्यता असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
हृदयद्रावक! इंजिनिअरींगचे शिक्षण घेणाऱ्या युवतीचा तडफडून मृत्यू…
प्रियकरासोबत आयटी युवतीचे ब्रेकअप अन् पुन्हा तो म्हणू लागला…
Video: हिंजवडीत सिमेंट मिक्सरखाली चिरडून दोन आयटी इंजिनियर युवतींचा मृत्यू…
हिंजवडीमध्ये आयटी अभियंता प्रेयसीची हत्या केली अन् शांतपणे…
पुणे शहरातील आयटी अभियंत्याचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू…
पुणे शहरातील आयटी अभियंत्याचा मारेकरी अटकेत, हत्येचे कारणही समोर…

