वाघोलीत पिझ्झा डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण अन् हवेत गोळीबार…
पुणे : पिझ्झा डिलिव्हरी देण्यासाठी उशीर झाल्याने चिडलेल्या ग्राहकाने पिझ्झा डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण करत हवेत गोळीबार केल्याची घटना मंगळवारी (ता. २४) रात्री वाघोली परिसरात असलेल्या वाघेश्वर मंदिराजवळ घडली आहे. चेतन वसंत पडवळ असे गोळीबार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
रोहित राजकुमार हुलसुरे हे वाघोली परिसरात असलेल्या एका पिझ्झा सेंटरमध्ये पिझ्झा डिलिव्हरी बॉयचे काम करतात. मंगळवारी रात्री उशिरा आरोपी चेतन पडवळ याने ऑनलाईन पिझ्झा डिलिव्हरीची ऑर्डर दिली होती. मात्र, ही ऑर्डर डिलिव्हरी बॉय रोहित हुलसुरे याने उशिरा पोहोचवल्याने आरोपीने रोहितला आधी मारहाण केली. या महाराणीचा जाब पडवळ यांना विचारण्यासाठी पिझ्झा डिलिव्हरी केंद्रातील देवेंद्र राहुल आणि इतर त्याचे मित्र गेले असता आरोपीने या सर्वांना मारहाण करत त्याच्या कारमधून एक पिस्तुल काढून हवेत गोळीबार केला.
दरम्यान, या प्रकरणी आरोपी चेतन पडवळ याच्यावर लोणीकंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे शहरात संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती; अनेक गाड्यांना उडवले…
पुणे शहरातील आजोबा कॉल गर्लला भेटले अन् पुढे…
हृदयद्रावक Video! पुणे शहरात जुळ्या मुलींचा एकाचवेळी दुर्देवी मृत्यू…
लोणीकंद पोलिसांनी वेशांतर करून पीएमपीएल बसमध्ये चोरी करणाऱ्यास पकडले…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!