कारच्या काचेवर धमकीची चिठ्ठी चिटकून खंडणी मागणाऱ्यास Unit-2ने केले जेरबंद…
पुणे (संदीप कद्रे): कारच्या काचेवर धमकीची चिठ्ठी चिटकून व्यापाऱ्यास खंडणी मागणाऱ्या आरोपीस Unit-2 ने जेरबंद केले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
कोरेगाव पार्क पोलिस स्टेशन गु र. क्र.128/2023 भादवि कलम 387,507 गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना पोलिस अंमलदार गजानन सोनुने व पुष्पेन्द्र चव्हाण यांनी काही एक धागे दोरे नसताना तांत्रिक विश्लेषण CCTV फूटेज तपासून तसेच गोपनीय माहितीद्वारे अनोळखी आरोपीचे नाव निष्पन्न करून सदर गुन्ह्यातील आरोपी श्रीनाथ यलाप्पा शेडगे (वय 25 धंदा – मजुरी रा. मुपो उंबरे (वेळापूर) ता. अकलूज जि. सोलापूर) येथे त्याच्या मूळ गावी असल्याची माहिती मिळाली. सदरची बातमी हि गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी वपोनि नंदकुमार बिडवई यांना कळवली असता त्यानी युनिट 2 कडील पो.उप.नि नितीन कांबळे पो अं अमोल सरडे,पो अं पुष्पेन्द्र चव्हाण, पोअ गजानन सोनुने यांची टीम तयार करून त्यांना तात्काळ आरोपींचा शोध घेणेबाबत आदेश दिले.
टीम ही खाजगी वाहनाने उंबरे (वेळापूर) ता. माळशिरस जिल्हा सोलापूर येथे जाऊन अकलूज पोलिसांची मदत घेऊन आरोपी श्रीनाथ यलाप्पा शेडगे (वय 25) यास ताब्यात घेऊन त्याने गुन्ह्यात वापरलेले वोडाफोन/आयडिया कंपनीचा सिम कार्ड ताब्यात घेऊन गुन्हे शाखा युनिट -2 पुणे शहर येथील कार्यालयामध्ये घेऊन आले. त्यास पुन्हा विश्वासात घेऊन सखोल तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. पुढील कारवाई कामी कोरेगाव पार्क पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी माननीय पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलिस उप-आयुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे-1 सुनील तांबे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांचे मार्गदर्शनाखाली पो उप नि नितीन कांबळे, पोलिस अंमलदार उज्वल मोकाशी, अमोल सरडे, गजानन सोनुने, पुषपेंद्र चव्हाण, उत्तम तारू, साधना ताम्हाणे, निखिल जाधव, मोसिन शेख, नागनाथ राख या पथकाने केली आहे.
पुणे विमानतळावर वृद्ध महिलेने बॉम्ब अफवा पसरवून उडवली धावपळ…
वादग्रस्त वक्तव्य! पुणे शहरातील कॉलेजचा प्राध्यापक निलंबित; गुन्हा दाखल…
पुणे शहरात व्यापाऱ्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना युनिट २ने केले जेरबंद…
पुणे-नगर महामार्गावरून गुन्हे शाखा युनिट ६ ने दोघांना ताब्यात घेतले अन्…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…