मदरशातल्या 10 विद्यार्थ्यांवर शिक्षकाने केला अनैसर्गिक बलात्कार…
अहमदाबाद (गुजरात) : जुनागढ जिल्ह्यात असलेल्या मदरशामधील 10 विद्यार्थ्यांवर शिक्षकाने अनैसर्गिक बलात्कार केला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
जुनागढ जिल्हा पोलिसांनी सोमवारी मदरशाच्या शिक्षकाला (मौलवी) आणि मदरशाच्या 55 वर्षांच्या ट्रस्टीला अटक केली आहे. मदरशाच्या मौलवीवर 10 अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक बलात्कार केल्याचा आरोप आहे, तर ट्रस्टीलाही मुलांनी तक्रार देऊनही काहीच कारवाई केली नसल्यामुळे अटक करण्यात आली आहे. शिक्षकाला सूरतमधून पकडण्यात आले आहे, तर मदरशाच्या ट्रस्टीला जुनागढहून अटक करण्यात आली.
एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली, यानंतर रविवारी मंगरोल पोलिसांनी दोन्ही आरोपींना भारतीय दंड संहितेच्या कलम 377 (अनैसर्गिक संभोग), 323 (हल्ला), 506-2 (धमकी), पॉक्सो कायदा याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारानंतर जुनागढ पोलिस अधिक्षक हर्षत मेहता यांनी मदरशाची पाहणी केली आणि विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांना निष्पक्ष तपासाचे आश्वासन दिले. पोलिस पुढील तपास करत आहेत.
संतापजनक! चुलत्याने सहा महिन्यांच्या चिमुकलीवर केला बलात्कार…
वहिनी आणि मांत्रिकाचे प्रेमसंबंध; दिर बलात्कार अन् आत्महत्या…
एकतर्फी प्रेमातून युवतीवर बलात्कार करून केला खून अन् मृतदेह…
युवतीची बलात्कारानंतर आत्महत्या; फरार संशयिताचा आढळला मृतदेह…
धक्कादायक! कुटुंबासमोरच तीन महिलांवर सामूहिक बलात्कार…