पुणे जिल्ह्यात अनैतिक प्रेमसंबंधास विरोध केल्याने पतीचा खून…

पुणे : अनैतिक प्रेमसंबंधास विरोध करणा-या पतीचा प्रियकराने केलेल्या खुनी हल्ल्यात मृत्यू झाला आहे. या प्रकरणी त्याची पत्नी, प्रियकर व त्याचा साथीदार या तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

पिनेश उर्फ मयुर महेंद्र धाईंजे (रा .टेंभुर्णीवेस नाका परिसर, इंदापूर), विजय नवनाथ शेंडे (रा. अंबिकानगर इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. ईश्वर भीमराव कांबळे (रा. टेंभुर्णीवेस नाका, इंदापूर) असे मृत युवकाचे नाव आहे. त्याचे वडील भीमराव सुदाम कांबळे (वय ६०, रा.आंबेगाव कुबेर प्रॉपर्टीज ता. हवेली जि. पुणे) यांनी फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ईश्वर हा फिर्यादी भीमराव कांबळे यांचा थोरला मुलगा होता. त्यास दोन मुले आहेत. दीड वर्षापुर्वी ईश्वरच्या पत्नीने सासरच्यांबरोबर भांडण केले होते. त्यानंतर ती नवरा व मुलांसह आपल्या माहेरी बाभुळगाव (ता. इंदापूर) येथे आली. काही दिवसानंतर ती नव-यासह इंदापूरमधील टेंभुर्णी वेस नाका परिसरात भाड्याच्या घरात राहू लागली होती. त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या पिनेश उर्फ मयुर महेंद्र धाईंजे याच्याबरोबर तिचे अनैतिक संबंध निर्माण झाले. या संदर्भात ईश्वरने वडिलांना कल्पना दिली होती. ही बाब सुनेच्या आईवडिलांच्या कानावर घातली होती. पिनेशला ही समजावुन सांगितले होते. मात्र, पिनेश किंवा त्या विवाहितेच्या वर्तनात काहीच फरक पडलेला नव्हता. ईश्वर ही पिनेशकडून आपल्या जीवाला धोका असल्याचे सतत सांगत होता.

२३ ऑक्टोबरच्या रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पिनेश धाईंजे व विजय शेंडे यांनी संगनमत केले. अनैतिक संबंधाच्या कारणावरुन घरी जाऊन ईश्वरबरोबर वाद घालून त्याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने पिनेशने त्याच्या हातातील धारदार शस्त्राने ईश्वराच्या पोटावर वार करुन त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर ते तिघे ही तेथून निघून गेले. जखमी ईश्वरला त्याच्या नातेवाईकांनी पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरु असताना आज (बुधवार) सकाळी त्याचा मृत्यू झाला.

गुन्हा घडल्यानंतर अवघ्या दोन तासात अकलूज (ता. माळशिरस, जि.सोलापूर) कडे पळालेल्या तीन ही आरोपींना इंदापूर पोलिसांनी पकडले. यातील विवाहिता जखमी असल्याने तिला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. फिर्याद दिल्यानंतर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होता. त्यामध्ये बदल करुन खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हिंजवडी पोलिस स्टेशन हद्दीतून बेपत्ता व्यक्तीचा खून अनैतिक संबंधातून…

पुणे शहरातील विजय ढूमे यांचा खून अनैतिक संबंधातून…

दिर आणि वहिणीचे अनैतिक संबंध अन् जीव गेला चिमुकल्याचा…

पुणे शहरातील युवकाचा खून अनैतिक संबंधातून; आरोपीला अटक…

निवृत्त पोलिसांना लेखक होण्याची सुवर्णसंधी!

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!