पुणे शहरातील नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू…
पुणे : नवले पुलाजवळ सिग्नलला उभ्या असणाऱ्या चारचाकी व दुचाकी वाहनांना ट्रकने जोराची धडक दिल्यामुळे झालेल्या विचित्र अपघात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. संदेश बानदा खेडेकर (वय ३४, रा. टिळेकर नगर, इस्कॉन मंदिराजवळ, कात्रज-कोंढवा रस्ता, पुणे) असे मृत युवकाचे नाव आहे.
आज (बुधवार) सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी ट्रकचालक पंकज राजाराम नटकरे (वय २१ वर्षे, रा. बसवकल्याण, बिदर, कर्नाटक) यास सिंहगड रस्ता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
कात्रजकडून नवले पुलाच्या दिशेने निघालेल्या ट्रक (KA 56- 3165) चालकाचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटले होते.सिग्नलला उभ्या असणाऱ्या चारचाकी वाहनाला पाठीमागून जोराची धडक दिली. यात चार चारचाकी वाहने व एका दुचाकीचा विचित्र अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. तर चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती समजताच सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे तसेच पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदारानी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, अपघातानंतर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. पण, वाहतूक पोलिसांनी तत्काळ अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. नवले पुलाजवळ यापूर्वी अनेक अपघात झाले असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. कात्रज चौक ते नवले पुल हा रस्ता सहा पदरी असून तीव्र उताराचा आहे. नवले चौकात येणारी वाहने वेगात येतात. त्यामुळे बऱ्याच वेळेस सिग्नलला उभे असलेल्या वाहनावर वेग नियंत्रित न झाल्यामुळे ब्रेक न लागल्याने अपघात होत आहेत.
नवले पुलावर ट्रकला भीषण अपघात; चार जणांचा होरपळून मृत्यू…
पोलिसांच्या वाहनाने चौघांना उडवले; एकाचा जागीच मृत्यू…
पुणे शहरात संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती; अनेक गाड्यांना उडवले…
हृदयद्रावक Video! पुणे शहरात जुळ्या मुलींचा एकाचवेळी दुर्देवी मृत्यू…
निवृत्त पोलिसांना लेखक होण्याची सुवर्णसंधी!
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!