Video क्रूरतेची हद्द! युवकाच्या अंगावर ८ वेळा ट्रॅक्टर घालून चिरडले…

जयपूर (राजस्थान) : जमिनीच्या वादातून एका गटाने दुसऱ्या गटातील युवकाची ट्रॅक्टरने चिरडून हत्या केल्याची धक्कादायक घटना भरतपूर भागात घडली आहे. आरोपी ट्रॅक्टर चालकाने जमिनीवर पडलेल्या युवकाच्या अंगावरून तब्बल ८ वेळा ट्रॅक्टर घालून चिरडले आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी मृत युवकाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अड्डा गावात बहादूर गुर्जर आणि अतर सिंह गुर्जर यांच्यात जमिनीचा वाद सुरू आहे. आज (बुधवार) सकाळी ८ वाजता दोन्ही गट समोरासमोर आले. दोघांनी एकमेकांवर जीवघेणा हल्ला सुरू करत एकमेकांवर दगडफेक केली. त्यावेळी दोन्ही गटाच्या महिलाही सहभागी होत्या.

हल्ल्यावेळी गोळीबारीचा आवाजही गावकऱ्यांनी ऐकला आहे. मारामारीत निरपत नावाचा युवक जमिनीवर पडला. तेव्हा बहादूर गटाच्या युवकाने ट्रॅक्टर निरपतच्या अंगावर घातला. ट्रॅक्टर चालकाला थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु तो थांबला नाही. त्याने जमिनीवर पडलेल्या निरपतच्या अंगावर तब्बल ८ वेळा ट्रॅक्टरचे चाक चढवले. त्यात घटनास्थळीच निरपतचा मृत्यू झाला. जमिनीच्या वादातून ५ दिवसांपूर्वीच २१ ऑक्टोबरला बहादूर आणि अतर सिंह गुर्जर यांच्यात वाद झाला होता. ज्यात बहादूर आणि त्याचा छोटा भाऊ गंभीररित्या जखमी झाला होता.

या घटनेनंतर बहादूरचा मुलगा दिनेश आणि दुसऱ्य गटातील अतर सिंह आणि त्याचा मुलगा निरपत, विनोद, दामोदर आणि नातेवाईक यांच्याविरोधात पोलिस तक्रार देण्यात आली होती. सध्या पोलिस घटनास्थळी पोहचले असून त्यांनी तपास सुरू केला आहे. ट्रॅक्टरचालक फरार झाला असून मृत युवकाचा मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवला आहे.

Video: दीरासोबत लग्न करण्यासाठी दोन वहिनींमध्ये जोरदार राडा…

हृदयद्रावक Video! पुणे शहरात जुळ्या मुलींचा एकाचवेळी दुर्देवी मृत्यू…

Video: स्लो मोशनच्या नादात Live मृत्यू झाला कॅमेऱ्यात कैद…

Video: युवतीला चुकीचे इंजेक्शन अन् आई-वडिलांसमोरच सोडला जीव…

निवृत्त पोलिसांना लेखक होण्याची सुवर्णसंधी!

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!