Video: ‘जेलर’ फेम अभिनेता विनायकनला अटक; कारण…

चेन्नईः दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या सोबत ‘जेलर’ चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता विनायकन याला केरळ पोलिसांनी अटक केली आहे. एर्नाकुलम टाउन नॉर्थ पोलीस ठाण्यात अभिनेत्याने दारुच्या नशेत राडा केला आहे.

विनायकन यांना त्यांच्या सोसायटीत काही समस्यांचा सामना करावा लागत असल्याने चौकशीसाठी पोलिसांनी त्यांना बोलावले होते. यावेळी पोलिस ठाण्यात त्यांनी राडा घातल्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘विनायकन दारूच्या नशेत पोलिस ठाण्यात आले होते. अधिकाऱ्यांसोबत विनाकारण वाद घातला. त्यानंतर त्याला वैद्यकीय चाचण्यांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी त्याच्यावर गोंधळ घालणे आणि पोलिसांवर अश्लील टिप्पणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.’

दरम्यान, दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘जेलर’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा चित्रपट चांगलाच गाजला होता. रजनीकांतसह या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या विनायकन यानेही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. जेलर या चित्रपटात त्याने वर्मन ही भूमिका साकारली होती. त्याची ही भूमिका चांगलीच गाजली होती. विनायकन हा दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे.

विनायकन हा पार्श्वगायक आहे. मल्याळम आणि तामिळ चित्रपटात त्याने भूमिका साकारली आहे. 1995 रोजी ‘मत्रिकम’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. 2016 मध्ये ‘कमातीपद्म’ या सिनेमातील कामासाठी त्याला केरळ स्टेट फिल्म अवॉर्ड मिळाला आहे. आता रजनीकांतच्या जेलर या चित्रपटाने विनायकनला खऱ्या अर्थाने ब्रेक मिळाला आहे. विनायकनने आजवर अनेक दाक्षिणात्य चित्रपटात आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.

ज्येष्ठ अभिनेते दलीप ताहिल यांना दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा…

आम्ही वेगळे झालोय! अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्र याचे ट्विट…

अभिनेता शाहरुख खानला सरकारने पुरवली Y+ स्कॉट सुरक्षा; कारण…

निवृत्त पोलिसांना लेखक होण्याची सुवर्णसंधी!

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!