पोलिसांच्या वाहनाने चौघांना उडवले; एकाचा जागीच मृत्यू…

सातारा : पोलिसांच्या वाहनाने चौघांना उडवले असून, यामध्ये एका युवकाचा मृत्यू तर तिघे जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कराड-ढेबेवाडी मार्गावर हा अपघात घडला आहे. सुजल उत्तम कांबळे (वय १७, रा. कोळीवाडी) असे या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

कराड-ढेबेवाडी मार्गावर पोलिसांच्या वाहनाने चौघांना उडवले आहे. यावेळी झालेल्या अपघातामध्ये सुजल उत्तम कांबळे या युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तो बारावीला शिकत होता. या अपघातामध्ये अन्य तीन जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एक जण गंभीर जखमी आहे. जखमींना उपचारासाठी कराडमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कराड तालुक्यातील कुसूर येथे रविवारी (ता. २२) रात्री 11 च्या सुमारास हा अपघात झाला आहे. दरम्यान, पोलीस गाडीचा चालक शंकर खेतमर याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, ऊसतोडीचा हंगाम सुरू झाल्याने ऊसतोड मजुरांची टोळी कुसूरमध्ये आणण्यात आली होती. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास एका वाहनातून टोळी उतरत होती. त्याचवेळी कोळेवाडीतील तरूण एकाला नेण्यासाठी दुचाकीवरून आला होता. यावेळी गप्पा मारत तीन-चार जण रस्त्याकडेला उभे राहिले होते. त्याचवेळी कोळेवाडीकडून ढेबेवाडीकडे निघालेल्या भरधाव पोलिसांच्या मोटारीने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या चार युवकांना उडवले.

पुणे शहरात संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती; अनेक गाड्यांना उडवले…

नवले पुलावर ट्रकला भीषण अपघात; चार जणांचा होरपळून मृत्यू…

मुंबई-गोवा महामार्गावर मोटार अपघातात दोघांचा जागीच मृत्यू…

समृद्धी महामार्ग अपघात प्रकरणी दोन आरटीओ अधिकाऱ्यांना अटक

आठ महिन्यांच्या गर्भवती पोलिस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!