कुटुंबातील ५ नव्हे तर १६ जणांच्या हत्येचा होता दोघींचा कट…

गडचिरोली : कुटुंबातील सदस्यांच्या जेवणात विषारी द्रव टाकून दोन महिलांनी मिळून २० दिवसांत कुटुंबातील ५ सदस्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर पोलिसांनी २ महिलेला अटक केली. या दोन्ही महिला आरोपींनी १६ जणांना मारण्याचा कट आखल्याचा धक्कादायक खुलासा पोलिस तपासात उघड झाला आहे.

२६ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत ही घटना घडली. एका पाठोपाठ एका कुटुंबातील ५ लोकांची हत्या झाल्याने खळबळ उडाली होती. हे सर्व मृत्यू नैसर्गिक वाटत होते. मृत लोकांच्या शरीरात वेदना, पाठीच्या खालील बाजून आणि डोके प्रचंड दुखू लागले, त्यामुळे उपचारावेळी यांचा मृत्यू झाला. २० सप्टेंबरला महागावातील शंकर कुंभारे आणि पत्नी विजया कुंभारे आजारी पडले. २६ सप्टेंबर आणि २७ सप्टेंबरला त्या दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर काही दिवसांनी शंकर यांचा मुलगा रोशन, मुलगी कोमल, आनंद यांनाही हीच लक्षणे जाणवली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या तिघांचा ८ ते १५ ऑक्टोबर काळात मृत्यू झाला होता.

शंकर यांचा दुसरा मुलगा सागर हा आई वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी दिल्लीहून आला होता. घरी परतल्यानंतर तोदेखील आजारी पडला. शंकर आणि विजया यांना चंद्रपूरला घेऊन जाणारा चालकही आजारी पडला. कुटुंबाच्या मदतीला आलेला एक नातेवाईकही अशाच लक्षणांनी आजारी पडला. त्याला हॉस्पिटलला दाखल करावे लागेल. जेव्हा डॉक्टरांना विषबाधेचा संशय आला. पण, प्राथमिक तपासात याची पुष्टी झाली नाही. पोलिसांनी सध्या या प्रकरणाच्या तपासासाठी ५ टीम तयार केल्या आहेत.

धोतराच्या बियाच्या विषारी द्रवाचा पहिला प्रयोग फसल्यानंतर संघमित्रा रामटेकेने इंटनेवर दर्प व रंग नसलेले द्रव शोधून काढले. हे द्रव तिला रोझा रामटेकेने उपलब्ध करून दिले. रोझाचे माहेर तेलंगणातील कागझनगर आहे. तेथून तिने हे द्रव मागविले असावे, असा पोलिसांचा अंदाज असून, त्यादृष्टीने तपास सुरू आहे. रोझाच्या संपर्कात नेमके कोण होते, याबाबत चौकशी सुरू असून, त्यानंतर आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

प्रेमविवाहानंतर नवऱ्यासह पाच जणांचा काढला काटा; गूढ उकलले…

भीषण अपघात! रिक्षावर ट्रक उलटून चार जणांचा जागीच मृत्यू…

ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची मध्यरात्री हत्या; नदीवर अंघोळ केली अन्…

विनायक मेटे यांच्या पुतण्याची गळफास घेऊन आत्महत्या…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!