महाराष्ट्रातील जवानाचा हृदयविकाराच्या धक्क्याने अरूणाचलमध्ये मृत्यू…

जळगाव: अरुणाचल प्रदेशात नियंत्रण रेषेवर कार्यरत असलेल्या महाराष्ट्राच्या जवानाचा मृत्यू झाला आहे. अर्जुन लक्ष्मण बावस्कर (वय ३५, रा. वरणगाव, ता. भुसावळ, जि. जळगाव) असे हुतात्मा झालेल्या जवानाचे नाव आहे.

भारतीय सेनेतील जवान दहा युनिट महार रेजिमेंटमध्ये नायक पदावर कार्यरत होते. अरुणाचल प्रदेश याठिकाणी 24 मार्च रोजी रात्रीची गस्त घालण्याचे कर्तव्य बजावत असताना दुपारी दीडच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. ज्या ठिकाणी ते सेवा बजावत होते त्या ठिकाणी प्राणवायू कमी असतो. प्रथम त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला त्यानंतर काही वेळात हृदयविकाराचा झटका आला आणि ते कोसळले.

जवानांनी त्यांना तत्काळ दवाखान्यात दाखल केले होते. मात्र, त्यांना वीरमरण आले आहे. याबाबतची माहिती कुटुंबीयांना कळताच अश्रू अनावर झाले. तसेच गावातील वातावरणही सुन्न झाले. अर्जुन बावस्कर हे गेल्या १५ वर्षांपासून कर्तव्य बजावत होते. सेवानिवृतीला दोन वर्षे बाकी असताना त्यांचे अकस्मात निधन झाले. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ, बहीण असा परिवार आहे. कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

महाराष्ट्राच्या जवानाला वीरमरण; वाहन कोसळले ८०० फूट खोल दरीत…

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळले; 4 जवान हुतात्मा…

Video: जवानाचा मृतदेह मिळाला तब्बल ५६ वर्षांनी…

Book Online Shop: जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे 3 महिने 21 दिवस)

जवान चंदू चव्हाण यांचे आमरण उपोषण; पाहा प्रमुख मागण्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!