
पुणे! आंबेगाव स्टेशनच्या पोलिसांनी पिस्टल बाळगणाऱ्यास केली अटक…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कोबींग ऑपरेशन व गुन्हे प्रतिबंधक चे अनुषंगाने गस्त करणेबाबत आदेशीत केले होते. त्याअनुषंगाने आंबेगाव पोलिस स्टेशनच्या परिसरात गस्त घालत असताना पिस्टल बाळगणाऱ्या एकास आंबेगाव स्टेशनच्या पोलिसांनी अटक केली आहे.
आंबेगाव पोलिस स्टेशनचे हददीत वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी प्रियंका गोरे हे तपास पथकासह असे दत्तनगर परीसरात गस्त घालत होत्या. पोलिस अंमलदार धनाजी धोत्रे व निलेश जमदाडे यांना खास बातमीदामार्फत माहिती मिळाली की, “आई श्री व्हीला अपार्टमेंटचे बाजुला एका गाईच्या गोठ्यामध्ये असलेल्या एकाकडे पिस्टल आहे. माहिती मिळताच सदर ठिकाणी सापळा रचून त्यास ताब्यात घेण्यात आले. आर्यन बापू बेलदरे (वय १९ वर्षे, काम शिक्षण, रा. आई श्री व्हीला अर्पाटमेंन्ट, फलॅट नंबर ३०४, तिसरा मजला, स्मा शन भुमी समोर, आंबेगाव बु, पुणे) यास ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडे एकुण रु.४०,१००/- रुपये किंमतीचा एक पिस्टल व एक जिवंत राउंडसह अनाधिकाराने, बेकायदेशीररित्या गुन्हा करण्याचे उद्देशाने विक्री करीता बाळगल्याने मिळून आले आहे. म्हणुन त्यांचे विरुध्द भारती विद्यापीठ पो स्टे गुन्हा रजि नं. १०५७/२०२४ भारतीय हत्याराचा अधिनियम कलम ३ सह २५ महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल केला असून, त्यास अटक केली आहे.’
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, रंजनकुमार शर्मा, पोलिस सहआयुक्त, पुणे शहर, प्रविणकुमार पाटील, अपर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे शहर, स्मार्तना पाटील, पोलिस उपआयुक्त, परिमंडळ – २ पुणे शहर, राहुल आवारे, सहाय्यक पोलिस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलिस स्टेशनकडील वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने, प्रियंका गोरे सपोनि, पोलिस अंमलदार शैलेंद्र साठे, हनमंत मासाळ, निलेश जमदाडे, धनाजी धोत्रे, प्रमोद भोसले, योगेश जगदाळे, विनायक पाडळे यांचे पथकाने केली आहे.
धडाकेबाज कारवाई! पुणे पोलिसांनी सायबर चोरट्यांच्या टोळीतील महिलेला बिहारमधून केली अटक…
पुणे बसमध्ये महिला एक दोन मिनिट तर नुसती कानशिलातच लगावत होती…
पुणे शहरात मौजमजेसाठी घरफोडी व स्पोर्ट बाईक चोरणाऱ्याला कोंढवा पोलिसांनी केली अटक…
पुणे शहरात प्रवाशांना लुटणाऱ्या तडीपार आरोपीला लष्कर पोलिसांनी केली अटक…
पुणे शहरात चोरी करणाऱ्या सराईत टोळीप्रमुखासह साथीदारांना लष्कर पोलिसांनी केली अटक…