पुणे न्यायालयातून पळालेल्या आरोपीस हडपसर पोलिसांनी केले जेरबंद…

पुणे (संदिप कद्रे): शिवाजीनगर कोर्टामध्ये पेशीकरीता आणल्यानंतर पळालेला मोक्यासारख्या गंभीर गुन्ह्यातील न्यायबंदी राजेश रावसाहेब कांबळे यास हडपसर पोलिस स्टेशन तपास पथकाने जेरबंद केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

हडपसर पोलिस ठाणे कडील गु.र.नं ५३७/२०१४ भा.दं.वि.कलम १४३, १४७, १४८, १४९, ३०२, ३५२ सह भारतीय हत्यार कायदा कलम ४,२५ सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम -३(१)(ii),३(२),३(४) या गुन्ह्यात न्यायलयीन बंदी आरोपी राजेश कांबळे हा सन २०१४ पासून येरवडा कारागृहात होता. तसेच नमुद आरोपीविरूध्द स्वारगेट पोलिस स्टेशन गु.र.नं २९५ / २०१० भा.दं.वि. कलम ३९५,४०२ भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ या दाखल गुन्ह्याची नियमीत सुनावणी सुरू होती. ०२/०८/२०२३ रोजी न्यायलयीन बंदी आरोपी राजेश कांबळे यास जिल्हा सत्र न्यायालय, शिवाजीनगर पुणे येथे स्वारगेट पोलिस स्टेशन गु.र.नं २९५ / २०१० भा.दं.वि. कलम ३९५,४०२ भारतीय हत्यार कायदा कलम ४,२५ या गुन्ह्याचे न्यायालयीन सुनावणी कामी सत्र न्यायालय, शिवाजीनगर पुणे येथे नियमीत पेशी करीता येरवडा कारागृह येथून पोलिस बंदोबस्तात घेवून गेले होते.

राजेश कांबळे याची न्यायालयीन सुनावणी संपल्यानंतर त्यास येरवडा कारागृहाकडे घेवून जात असताना तो पोलिस पथकाच्या कायदेशिर रखवालीतून पळून गेला होता. त्याबाबत शिवाजीनगर पोलिस स्टेशन गु.र.नं १६० / २०२३ भादंवि कलम २२४, २२५, ३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती. परंतु तो मिळून आलेला नव्हता. पोलिस आयुक्त, अप्पर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पोलिस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांच्या आदेशावरून हडपसर पोलिस स्टेशन तपास पथक नमुद आरोपीचा शोध घेत असताना केलेला तांत्रिक तपास व बातमीदारांकडून नमुद आरोपी केज जिल्हा बिड येथे लपून बसले असल्याची खात्री लायक माहिती हडपसर पोलिस स्टेशनचे पोलिस अंमलदार संदीप राठोड व अजित मदने यांना मिळाली होती.

हडपसर पोलिस स्टेशन तपासपथकाने सापळा रचून २०.०१.२०२४ रोजी पहाटेच्या सुमारास आरोपी राजेश रावसाहेब कांबळे (वय ३७ वर्ष रा. सर्वे नं १०६, गोसावी वस्ती, हडपसर पुणे) यास केज, जिल्हा बिड येथून शिताफीने ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेला आरोपी राजेश कांबळे यास पुढील कायदेशिर कार्यवाहीकामी शिवाजीनगर पोलिस स्टेशन पुणे यांच्या ताब्यात देण्यात येत आहे.

सदरची कामगिरी ही पोलिस आयुक्त रितेश कुमार, अप्पर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, रंजनकुमार शर्मा व पोलिस उप आयुक्त, परिमंडळ ५, आर राजा यांचे मागदर्शनाखाली सहाय्यक पोलिस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, अश्विनी राख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक हडपसर पोलिस स्टेशन, पुणे शहर, रविंद्र शेळके, पोलिस निरीक्षक (गुन्हे), विश्वास डगळे, पोलिस निरीक्षक (गुन्हे), संदीप शिवले सो, यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलिस निरीक्षक अर्जुन कदळे, पोलिस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलिस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड, जोतीबा पवार, सचिन जाधव, प्रशांत टोणपे, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, भगवान हंबर्डे, सचिन गोरखे, अजित मदने, चंद्रकांत रेजीतवाड, अमोल दणके, कुंडलीक केसकर, रामदास जाधव, यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

मोक्का १०९! हडपसर पोलिस स्टेशन हद्दीमधील १६ जणांवर मोक्का; पाहा नावे…

Video: हडपसर पोलिसांनी गुन्हेगारांची काढली धिंड; पाहा नावे…

एमपीडीए ७६! हडपसरमधील अट्टल गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई…

हडपसर पोलिसांनी चोरीचा गुन्हा उघड करून मुद्देमाल केला जप्त…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!