Video: पुणे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न विचारणाऱ्यांना आयुक्तांचे बेधडक आव्हान…

पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगरमध्ये भरधाव वेगात गाडी चालवणाऱ्या कारचालकाने दोघांचा बळी घेतला याप्रकरणी अल्पवयीन कारचालकाचे वडील आणि बांधकाम व्यवसायिक विशाल अगरवाल यांच्यासह सात जणांना अटक करण्यात आली आहे.

कल्याणीनगरमध्ये घडलेल्या अपघातातील आलिशान पोर्शे कार विनानोंदणी रस्त्यावर धावत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संपूर्ण घटनेनंतर आता विरोधकांनी पुणे पोलिस आयुक्तांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस आयुक्त अमितशे कुमार यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली आहे. पुणे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न विचारणाऱ्यांना आयुक्तांचे बेधडक आव्हान दिले आहे. पुणे पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेपेक्षा आणखी जास्त कडक भूमिका कोणी सुचवत असेल तर त्यांच्याशी चर्चा करण्याची आमची तयारी आहे.

पुणे पोलिसांनी वेळीच काळजी घेतली असती तर दोन जीव नक्कीच वाचले असते…

अमितेश कुमार म्हणाले, आमच्यवर कोणाचाही दबाव नसून कडक कारवाई करणे हीच आमची भूमिका आहे. रविवारी आम्ही न्यायालयात दोन अर्ज दाखल केले होते. पहिला अर्ज आरोपीला प्रौढ ठरवण्याचा आणि दुसरा रिमांड होमचा. मात्र, दुर्दैवाने न्यायालयाने आमचे दोन्ही अर्ज फेटाळले. हा अत्यंत गंभीर गुन्हा असून यामध्ये 304 कलमांतर्गत सात वर्षापेक्षा जास्त शिक्षा आहे. त्यांचे वय हे 16 वर्षापेक्षा अधिक आहे. त्यामुळे बालन्याय कायद्यानुसार प्रौढ म्हणून वागणूक मिळाली पाहिजे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मद्य पिऊन रहादारीच्या रस्त्यावर वेगाने वाहन चालवणे हा अतिशय गंभीर गुन्हा आहे. जोपर्यंत या अर्जावर निर्णय होत नाही तोपर्यंत त्यांना 14 दिवसासाठी रिमांड होममध्ये पाठवण्यात यावे. मात्र, न्यायालयाने आमचे दोन्ही अर्ज फेटाळले.’

‘पुणे पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेपेक्षा आणखी जास्त कडक भूमिका कोणी सुचवत असेल तर त्यांच्याशी चर्चा करण्याची आमची तयारी आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून कायद्याच्या मार्गावर आहे. जी दुर्दैवी घटना घडली आहे. ज्या दोन निष्पाप जीवांचा बळी गेला आहे, त्यांना न्याय मिळावा तसेच आरोपीला कठोर शिक्षा मिळावी हीच आमची भूमिका आहे. कोणत्याही प्रकारचा दबाव पोलिसांवर कधी नव्हताच, असेही अमितेश कुमार यांनी सांगितले.

पुणे शहरातील अपघातातील आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी आमचा प्रयत्नः पोलिस आयुक्त

हिट अँड रन! पुणे शहरात दोघांचा जीव घेतल्याप्रकरणी होणार कारवाई…

पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर…

पुणे शहरात मध्यरात्री पार्टी करून जात असलेल्या युवकाने घेतला २ जणांचा जीव…

पुणे शहरात ‘रात्रीस खेळ चाले’; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे…

Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…

Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…

पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!