पोलिसकाकाचा अमेरिकेत डंका! 40 अंडी, एक किलो चिकन…

जालना : जालन्यातील प्रसिद्ध बॉडी बिल्डर किशोर डांगे यांनी लॅटिन अमेरिका येथे झालेल्या बॉडी बिल्डिंग स्पर्धेत त्यांनी रौप्य पदकाची कमाई केली आहे. त्यामुळे डांगे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

कन्हैयानगर सारख्या झोपडपट्टी एरिया मध्ये राहणारे डांगे यांनी 16 वर्षांपासून शरीरसौष्ठव करत आहेत. पोलिस दलातील नोकरी सांभाळून त्यांनी आपला छंद जोपासला आहे. त्यांनी आतापर्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सिल्वर, गोल्ड आणि ब्रॉझ अशी विविध पदके मिळवली आहेत. नुकत्याच लॅटिन अमेरिका येथे झालेल्या बॉडी बिल्डिंग स्पर्धेत त्यांनी सिल्वर मेडल तर पावर लिफ्टिंग प्रकारात ब्रांझ मेडल मिळवले आहे.

महाराष्ट्र पोलिस मध्ये जालना जिल्ह्यामध्ये कॉन्स्टेबल पदावर ते कार्यरत आहे. 17 ते 25 नोव्हेंबर दरम्यान अमेरिका देशांमधील खेळाडूंसाठी मेक्सिको येथे स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये विविध खेळ खेळले गेले. किशोर डांगे यांनी सांगितले की, ‘भारताचे प्रतिनिधित्व करताना बॉडी बिल्डिंगमध्ये सिल्वर मेडल तर पावर लिफ्टिंग प्रकारामध्ये ब्रांझ मेडल मिळवला आहे. एक चित्रपट पाहून मी बॉडी बिल्डिंग या क्षेत्राकडे वळलो याआधी देखील मी आंतरराष्ट्रीय पातळीवर एक गोड एक सिल्वर आणि एक ब्रांझ मेडल मिळवले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे नाव उंच व्हावं आणि त्यासाठी मी सतत प्रयत्नशील असतो.’

मी दिवसाला तब्बल आठ वेळा डायट करतो. दिवसभरात 40 अंडी, एक किलो चिकन, एप्पल, फ्रुट सलाड आणि ग्रीन सलाड अशा प्रकारचा डायट मी घेतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिम मध्ये जाऊन व्यायाम करतो. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ असे तीनही वेळेस वर्कआउट करणे गरजेचे असते. आपापल्या क्षमतेनुसार एक ते दीड तास वर्कआउट करावे वर्कआउट करताना टेक्निकल बाबी लक्षात घेऊनच वर्कआउट केले पाहिजे, असे किशोर डांगे यांनी सांगितले.

Video: पोलिसकाकाने आजीला उचलून घेत घडवलं देवाचं दर्शन…

पिंपरी-चिंचवडच्या पोलिसकाकाने जिंकले दीड कोटी रुपये; पण…

पोलिसकाकाचे लग्नाचे वय आणि चांगल्या स्थळाच्या सुट्टीचा अर्ज व्हायरल…

पोलिसकाका विजय चौधरी यांनी भारताला मिळवून दिले सुवर्णपदक…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!