Video: भारतीय हवाई दलाचे एअरक्राफ्ट कोसळले, दोन पायलटचा मृत्यू…

हैदराबाद : हैदराबादमध्ये भारतीय हवाई दलाचे प्रशिक्षणार्थी एअरक्राफ्ट आज (सोमवार) कोसळले असून यामध्ये २ पायलटचा जागीच मृत्यू झाला आहे. एअरक्राफ्ट डंडीगलमध्ये हवाई दलाच्या अकॅडमीत ट्रेनिंग वेळी कोसळले.

एअरक्राफ्ट कोसळल्यानंतर भारतीय हवाई दलाने माहिती दिली आहे. हैदराबादहून नियमित प्रशिक्षणासाठी उड्डाणावेळी आज सकाळी पिलाटस पीसी ७ एमके आयएल ट्रेनल विमानाचा अपघात झाला. विमानातील दोन्ही पायलटना गंभीर दुखापत झाली होती आणि यातच त्यांचा मृत्यू झाला.

एअरक्राफ्ट कोसळल्याच्या या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. सुदैवाने या अपघातात कोणत्याही सर्वसामान्य नागरिकाला दुखापत झालेली नाही. भारतीय हवाई दलाने या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

कवठे येमाई परिसरात पडला सुखोई विमानाचा पार्ट अन्…

भारतीय अब्जाधीश उद्योगपतीसह सहा जणांचा विमान अपघातात मृत्यू…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!