हृदयद्रावक! मायलेकीचा मृतदेह पाहून नातेवाईकांनी केला आक्रोश…

नाशिक: विहिरीवर पाणी आणायला गेलेल्या मायलेकींचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मालेगावमध्ये घडली आहे. निताबाई जाधव आणि त्यांची मुलगी इच्छामणी असे मृत्यू झालेल्या मायलेकींची नावे आहेत. विहिरीतून पाणी ओढत असताना मुलगी पाय घसरून विहिरीत पडली. तिला वाचवण्यासाठी आईनेही उडी मारली. मात्र, पोहता येत नसल्याने दोघींचा बुडून मृत्यू झाला आहे.

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

मालेगाव तालुक्यातील झोडगे येथे पाणी भरायला आणि कपडे धुण्यासाठी मायलेकी गेल्या होत्या. त्यावेळी विहिरीतील पाणी काढत असताना पाय घसरून मुलगी विहिरीत पडली. तिला वाचवण्यासाठी आईने उडी मारली. पण दोघीही बुडून मृत्यूमुखी पडल्या. शेळ्या-मेंढ्या चारणारे घरी परतत असताना त्यांच्या लक्षात ही बाब आली. स्थानिकांनी त्यांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. यावेळी नातेवाईकांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. दरम्यान, पोलीसात या प्रकऱणी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, मायलेकींचे मृतदेह बाहेर काढल्यानंतर नातेवाईकांनी आक्रोश केला होता. परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

हृदयद्रावक! चिमुकल्याला आईसमोरच जमिनीवर जोरात फेकले…

हृदयद्रावक! एकाच कुटुंबातील चिमुकल्यासह 7 जणांचा होरपळून मृत्यू; अश्रू अनावर…

हृदयद्रावक! नवरदेवासह बहीण अन् भाचीचा अपघातात जागीच मृत्यू…

हृदयद्रावक! डॉक्टर होणाऱ्या पत्नीला भेटून आला अन् काळाने घातला घाला…

हृदयद्रावक! कन्येचा विवाह सोहळा पार पडला अन् बापावर काळाने घाला घातला…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!