शिक्षकाने ब्लॅकमेल करत असल्याचे स्टेटस ठेवून केली आत्महत्या…

बीड: एका शिक्षकाने मोबाईलवर काही जण ब्लॅकमेल करत असल्याचे स्टेटस ठेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अंकुश पवार (वय 33) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे.

अंथरवणपिंप्री तांडा येथील खाजगी संस्थेत ते शिक्षक म्हणून कार्यरत होते. अंकुश पवार यांनी बुधवारी (ता. 6 ) सकाळी आपल्या मोबाईलवर काही जण धमकी देत असल्याचे स्टेटस ठेवून आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

अंकुश पवार यांनी आत्महत्येपूर्वी मोबाईलवर ठेवलेल्या स्टेटसमध्ये म्हटले होते की, ‘पाच जण मला काही दिवसांपासून ब्लॅकमेल करत असून दहा लाख रुपयांची मागणी करत आहेत, यापूर्वी मी त्यांना पाच लाख रुपये दिले आहेत. तरीही आता या पाच जणांकडून पैसे न दिल्यास माझ्या कुटुंबांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.’ याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

‘प्रेम करताना जात धर्म बघू नका,’ असे स्टेटस ठेवत प्रेमीयुगलाची आत्महत्या…

मी मेल्यावर तू रडशील का? असे स्टेटस ठेवून घेतला जगाचा निरोप…

व्हॉट्सऍपवर स्टेटस ठेवल्याच्या कारणावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी…

बस किस्मतने साथ नही दिया साहब, वरना दिल तो हमारा भी पागल था…

प्रेम प्रकरणातून नदीत उडी मारलेल्या युवकाचा चौथ्या दिवशी सापडला मृतदेह…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!