पोलिसकाकाचे लग्नाचे वय आणि चांगल्या स्थळाच्या सुट्टीचा अर्ज व्हायरल…
लखनौ (उत्तर प्रदेश): फारुखाबाद जिल्ह्यातील एका कॉन्स्टेबल राघव चतुर्वेदी यांचे रजेचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. पत्रात रजा घेण्याचे कारण नमूद केले असून लग्नाचं वय निघून जात असल्याचे म्हटले आहे. पण, यापूर्वी सुद्धा अशी पत्र व्हायरल झाली होती आणि ती कोणीतर खोडसर पणाने व्हायरल केल्याचे पुढे आले होते.
मोठ्या कष्टाने चांगलं स्थळ आले आहे. मुलीला भेटायला जायचं आहे, कृपया पाच दिवसांची रजा द्या असे म्हटले आहे. कॉन्स्टेबलच्या या पत्रावर सीओ सिटी यांनी त्याची रजा मंजूर केली आहे. हे संपूर्ण प्रकरण फारुखाबादच्या कादरी गेट पोलीस ठाण्यात तैनात कॉन्स्टेबल राघव चतुर्वेदी यांच्याशी संबंधित आहे. आपल्या अर्जात कॉन्स्टेबलने लिहिले आहे की, ‘पोलीस दलात तीन वर्षांपासून कार्यरत आहे. आता लग्नाचं वयही जवळ येत आहे. आजकाल पोलिसांसाठी स्थळ येत नाहीत. वडिलांनी फोन करून सांगितलं की त्यांना एक चांगलं स्थळ सापडलं आहे. मुलगी पाहण्यासाठी पाच दिवसांचा अवधी द्यावा. रजेचा असा अर्ज वाचून अधिकाऱ्यांनी 5 दिवसांची रजा मंजूर केली.’
दरम्यान, संबंधित पत्र आता सोशल मीडियावरही तुफान व्हायरल होत आहे. सध्या सीओ सिटी यांनी कॉन्स्टेबलच्या 15 दिवसांच्या सीएलला मान्यता दिली आहे. मात्र रजेचा अर्ज आणि त्याचे कारण हा लोकांमध्ये चर्चेचा विषय राहिला आहे. हे पत्र पण एक खोडसळ पणा असू शकतो, असे नेटिझन्सने म्हटले आहे.
अशोक इंदलकरः लेखक आणि इतिहासाची आवड असणारा अधिकारी!
रमेश धुमाळ: अथक मेहनतीतून बनले पोलिस उपायुक्त!
पौर्णिमा तावरे: व्याख्यान ऐकले आणि क्लास वन अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले!
अरविंद माने: अनुभवातून घडला कर्तव्यदक्ष अधिकारी!
क्रांतीकुमार पाटील: कोल्हापूरच्या लाल मातीतील रांगडा पोलिस अधिकारी!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…