एकतर्फी प्रेम! बीएचएमएसच्या विद्यार्थिनीची धमक्यांना कंटाळून आत्महत्या…
छत्रपती संभाजीनगर : एकतर्फी प्रेमातून होणाऱ्या युवकाच्या त्रासाला कंटाळून बीएचएमएसच्या विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, युवकाला अटक करण्यात आली आहे.
एकतर्फी प्रेमातून त्रास देणाऱ्या आरोपीचे नाव दत्तू बाबासाहेब गायके आहे, तर त्रासाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव गायत्री बाबासाहेब दाभाडे असे आहे. प्रेम विवाह केल्याने जावयाची हत्या केल्याचं प्रकरण ताज असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये एकतर्फी प्रेमातून त्रास देत असल्याने बीएचएमएसच्या (BHMS) विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
गायत्री ही शहरातील फोस्टर महाविद्यालयात बीएचएमएसच्या द्वितीय वर्षाला शिक्षण घेत होती. गावात असताना गायत्रीचे आरोपीसोबत काहीवेळा बोलणे झाले होते. मात्र, शहरात आल्यानंतर ती त्याच्याशी बोलत नव्हती. त्यामुळे आरोपी गायत्रीच्या मोबाइलवर सतत फोन करून त्रास देत होता आणि भेटण्यासाठी बोलावत होता. गायत्रीने याविषयी तिच्या मावशीकडे तक्रार केली होती. मावशीने गावी जानेफळमध्ये आरोपीला भेटून गायत्रीला फोन करून त्रास देऊ नकोस, असे समजावून सांगितले होते. त्यानंतरही त्याचा त्रास देणे थांबले नव्हते.
माझ्यासोबत मैत्री कर, मला भेटायला ये असे म्हणून आरोपी विद्यार्थिनीला गेल्या वर्षभरापासून त्रास देत होता. माझ्यावर प्रेम केलं नाही तर आत्महत्या करेल, अशी धमकीही या युवकाने या विद्यार्थिनीला दिली होती. त्यामुळे घाबरलेल्या बीएचएमएसच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या गायत्री दाभाडे या युवतीने हॉस्टेलमध्येच गळाफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी दत्तू गायके याला पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमधील इंदिरानगर परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली होती. आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलीचे वडील आणि चुलत भावाने जावयावर चाकूने गंभीर वार करून हत्या केली होती. बापानेच जातीभेदापोटी मुलीचे कुंकू पुसले. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असतानाच आता बीएचएमएसच्या विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पोलिसकाका Video News: 01 ऑगस् रोजीच्या Top 10 बातम्या…
दाऊद शेख आक्षेपार्ह फोटो दाखवून यशश्रीला करायचा ब्लॅकमेल…
ऑनर किलिंग! वडील मलाही संपवतील; विद्याचा मन सुन्न करणारा आर्त टाहो…
ऑनर किलिंग! अमितच्या ओरड्याचा हृदय पिळवटून टाकणारा आवाज; पाहा Video…
‘सैराट’ची पुनरावृत्ती! प्रेमविवाह केला म्हणून युवकाची हत्या…
पिंपरी-चिंचवडमध्ये ‘सैराट’ची पुनरावृत्ती; साडूने केला खून…
प्रेमाची सैराट कहाणी! बहिणीचा ड्रायव्हरसोबत पळून प्रेमविवाह अन् पुढे…
सैराटची पुनारवृत्ती! प्रेमविवाहानंतर बाप आणि भाऊ चिडला अन्…
सैराटची पुनरावृत्ती! दोन सख्या भावांनी बहिणीची कुऱ्हाडीने केली हत्या…
ऑनर किलींगचा प्रयत्न हाणून पाडणाऱ्या पोलिसावर हल्ला; गुन्हा दाखल…