
पुणे शहरात वाहन चोरी करणाऱ्या सराईतास युनिट ६ गुन्हे शाखेने केले जेरबंद…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात वाहन चोरी करणाऱ्या सराईत आरोपीस युनिट ६ गुन्हे शाखेने जेरबंद केले असून, त्याच्याकडून एकुण ०४ गुन्हे उघड केले आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
गुन्हे शाखा युनिट-६ कडील पोलिस अंमलदार हे युनिटचे हद्दीत १०/०१/२०२४ रोजी पेट्रोलिंग करीत होते. युनिट कडील पोलिस अंमलदार, सकटे व मुंढे यांना खात्रीशीर बातमी मिळाली की, स्वप्नील व्हणमाने याच्याकडे चोरीची वाहन असून, तो सासवड रोड रेल्वे स्टेशन जवळ काळेपडळ, हडपसर येथे सार्वजनिक रोडवर उभा आहे अशी माहिती मिळाली. सदर बातमीचे अनुशंगाने वरिष्ठांचे सूचनेप्रमाणे तात्काळ युनिट-६ कडील अंमलदार हे हडपसर भागात पुणे सासवड रोडवर जावून बातमीतील वर्णनाच्या व्यक्तीचा शोध घेत असताना, नमुद बातमीतील वर्णनाची व्यक्ती सासवड रोड रेल्वे स्टेशन जवळ, काळेपडळ, हडपसर येथे सार्वजनिक रोडवर उभी असलेली दिसली. त्याच्या ताब्यातील मोटार सायकलसह ताब्यात घेऊन, त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव स्वप्नील नागनाथ व्हणमाने( वय २३ रा. शिवतेजनगर काळेपडळ, हडपसर, पुणे) असे असल्याचे सांगितले. मोटार सायकलचे मालकी हक्काबाबत कागदपत्रांची विचारपुस केली असता त्याने कोणतीही कागदपत्रे सादर केली नसल्याने, सदरची मोटार सायकल चोरीची खात्री झाल्याने, त्यास सी.आर.पी.सी ४१ (१)(ड)प्रमाणे अटक केली आहे.
आरोपीकडे अधिक तपास करता, त्याचेकडुन १) हडपसर पोलिस स्टेशन गुन्हा रजि.नं.५७/२०२४ भा.द.वि.क.३७९ २) हडपसर पो.स्टे गु.र.नं.१००/२०२३,भा.दं.वि.कलम ३७९ ३) सिंहगड पो.स्टे गु.र.नं.६५/२०२१,भा.दं.वि. कलम ३७९ ४) शिक्रापुर पो.स्टे गु.र.नं. ११५/२०२०, भा.दं.वि.कलम ३७९ असे एकूण ०४ गुन्हे उघडकीस आणून एकूण १,१५,०००/- रुपये किंमतीची वाहने जप्त केली आहेत. त्याचेवर यापुर्वी हडपसर पो स्टे व सदर बाजार पो स्टे, सोलापूर याठिकाणी वाहन चोरीच गुन्हे दाखल आहेत. पुढील कार्यवाही कामी आरोपीस हडपसर पोलिस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपआयुक्त, गुन्हे, पुणे, अमोल झेंडे, सहा. पोलिस आयुक्त, गुन्हे-२, पुणे, सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-६ चे पोलिस निरीक्षक, उल्हास कदम, पोलिस अंमलदार, विठ्ठल खेडकर, बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे, प्रतिक लाहीगुडे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, महेंद्र कडु, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली.
वाघोलीमध्ये मुलीचा खून करणाऱ्या बापास युनिट ६ने तीन तासात केली अटक…
वाघोली येथे चोरी करणाऱ्याला युनिट 6ने घेतले ताब्यात अन्…
महाराष्ट्रात ठिकठिकाणी दरोडा टाकणाऱ्या आरोपीस युनिट ६ ने शिताफीने केले जेरबंद…
शरद मोहोळ हत्या प्रकरणात आणखी नवी माहिती समोर…
पुणे शहरात कंपनीत एचआर पदावर काम करणाऱ्या युवतीवर बलात्कार…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

