
लग्नानंतर नवरा म्हणाला, माझे एका मुली सोबत ६ वर्षापासून प्रेम संबंध…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी येथील विवाहिता स्नेहल उर्फ सोनू वैभव मांडळे (३३, रा. राधीका ले आउट, दर्डा नगर, यवतमाळ ह. मु. राम मंदीर, घाटंजी) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पती वैभव मांडळे (३५), सासरे माधव मांडळे (६८), सासू छाया मांडळे (४२), नाद मुग्धा पाचकवडे (४२) व राहुल पाचकवडे (४५, रा. दाभा नागपूर) विरुद्ध अपराध क्रंमाक ५७३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ८५, ३ (५) अंतर्गत घाटंजी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा तपास घाटंजी पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलिस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार विनोद मेश्राम करीत आहे.
पोलिस सुत्रानुसार, फिर्यादी स्नेहल उर्फ सोनू वैभव मांडळे यांनी घाटंजी पोलिस स्टेशनला हजर होऊन जबानी रिपोर्ट दिला की, पती वैभव माधव मांडळे, सासरे माधव मांडळे, सासु सौ. छाया माधव मांडळे असे राहत असुन गृहीणी म्हणून काम करते. फिर्यादीचा विवाह १४ डिसेंबर २०२२ रोजी दर्डा नगर राधिका ले आऊट, यवतमाळ येथील वैभव माधव मांडळे याचे सोबत रिती रिवाजा प्रमाणे झाला होता. पती वैभव मांडळे यांनी लग्नानंतर दि. १४ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १२ वाजताचे सुमारास फिर्यादीस सांगीतले की, माझे एका मुली सोबत ६ वर्षापासून प्रेम संबंध आहे. ती मला आतापण आवडते. माझे लग्न तुझ्या सोबत जबरदस्तीने माझ्या वडीलांनी लावुन दिले आहे, असे पतीने म्हटले. मी त्याला समजावुन सांगीतले की, जे झाले ते विसरुन जा आता नविन जिवनाची सुरुवात करु असे म्हटले. परंतु माझे पती फिर्यादीला तेव्हा पासुन शारिरीक व मानसिक त्रास देवुन लहान सहान गोष्टीवर फिर्यादीशी वाद घालत असतात. लग्नाचे दोन महिन्यानंतर मी सर्व हकिकत माझी सासु छाया मांडळे व सासरे माधव मांडळे यांना सांगीतले. परंतु त्यांनी सुध्दा फिर्यादीच्या पतीला काहीच म्हटले नाही. उलट फिर्यादीला दोष देत होते. परंतु माझे पती वैभव मांडळे यांच्यात काहीही सुधारणा झाली नाही. उलट मलाच शिवीगाळ करुन अंगावर मारायला येत होते म्हणुन मी त्यांचा त्रासामुळे पोलिस स्टेशन घाटंजी येथे दि. १३ डिसेंबर २०२३ रोजी महिला सुरक्षा कक्ष, पोलिस अधीक्षक कार्यालय, यवतमाळ येथे लेखी तक्रार दिली होती.
यवतमाळ येथे महिला सुरक्षा कक्ष येथे फिर्यादी व पती वैभव मांडळे यांची सुनावणी झाली. पती वैभव मांडळे यांनी फिर्यादीला चांगली वागणुक देतो असे म्हटले. म्हणुन पत्नीने तक्रार परत घेतली होती. त्यानंतर पतीकडे नांदावयास गेली. त्यांनी आणखी काही दिवस चांगले वागवीले व नंतर माझे पतीने मला म्हटले की, तु स्वंयपाक करायचा नाही. असे सांगीतल्यावर मी म्हटले की मी स्वयंपाक कां करायचे नाही, तेव्हा माझे पती वैभव मांडळे, सासु छाया मांडळे, सासरा माधव मांडळे यांनी तु स्वंयपाक केला तर जेवणात काही टाकुन देशील म्हणून संशय करुन मला शिवीगाळ करत होते. तसेच सौ. मुग्धा राहुल पाचकवडे, राहुल रामराव पाचकवडे यांनी वैभव मांडळे याला म्हणाले की, तु पत्नीला सोडून दे तुला दुसरी पत्नी करुन देतो, असे म्हणून पतीला माझ्या विरुध्द भडकुन देत होते. सन २०२३ मध्ये रिती रिवाजा प्रमाणे फिर्यादीच्या आईने पती वैभवला ३ ग्रॅमची सोन्याची अंगठी भेट दिली होती. तसेच त्यावेळी पतीने मला २० हजार रुपये मागीतले होते. त्यांच्या आग्रहाने २० हजार रुपये माझ्या आईने पतीला दिले होते. तसेच एप्रिल २०२३ मध्ये पती वैभव याने आईकडुन १५ हजार रुपये घेतले होते. तसेच दिवाळीमध्ये त्याच्या मागणी प्रमाणे ५ ग्रॅमची अंगठी व १० हजार रुपये नगदी व कपडे दिले होते. पती प्रत्येक सनाला सोन्याच्या वस्तुची मागणी करत होता. त्याला वस्तु दिले नाहीतर तो मला शारिरीक व मानसिक त्रास देत होता. तसेच आक्टोबर २०२३ मध्ये फिर्यादीचे पती वैभव मांडळे यांनी मोटर सायकलची मागणी केली होती.
दरम्यान, घाटंजी पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलिस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार विनोद मेश्राम पुढील तपास करीत आहे.
दोन नवरे, एक प्रियकर अन् दीर आणि सासऱ्यासोबत अनैतिक संबंध…
Video: युवतीला सहा प्रियकर! एका प्रियकराने सर्वांना रेस्टॉरंटमध्ये बोलावले अन्…
प्रेम प्रकरण! फोन सायलेंट मोडवर अन् प्रेयसीचा झाला मोठा गैरसमज…
पुणे! कोंढव्यातील पीडित युवतीने पोलिसांनाच केला उलट प्रश्न अन् अडकली…
जळगाव! गायत्री पाटील प्रकरणाला मिळालं नवं वळण…

