मुंढवा परिसरात सावकारांच्या धमकीमुळे एकाची आत्महत्या…

पुणे (संदीप कद्रे) : सावकारांच्या सततच्या धमकीमुळे एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मुंढवा भागात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

राम परशुराम भोसले (५१, रा. साईसृष्टी बिल्डींग, केशवनगर, मुंढवा) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी भोसले यांची पत्नी सुरेखा यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजेश, राज तावदान, सिद्धू मंगवाणी, बलविंदर सिंग, नंदकुमार अडसूळ, शंकर पाटील, पाटील याची पत्नी, तसेच अजित इरकल यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंढवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राम भोसले यांची आई आजारी होती. आईचे आजारपण आणि वैयक्तिक अडचणींमुळे त्यांनी सात वर्षांपूर्वी आरोपी राजेश, राज तावदान, सिद्धू मंगवाणी यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. व्याजाची परतफेड केल्यानंतरही आरोपींनी त्यांच्याकडे पुन्हा पैशांची मागणी केली. त्यामुळे भोसले यांनी आरोपी अडसूळ याच्याकडून पाच लाख रुपये व्याजाने घेतले. शंकर पाटील, त्याची पत्नी आणि इरकल यांनी त्यांना व्याजाने पैसे मिळवून देण्यास मदत केली होती. त्याबदल्यात यांना भोसले यांनी ५० हजार रुपये देखील दिले होते.

दरम्यान, व्याजाने घेतलेल्या पैशांची परतफेड करत असताना देखील आरोपी त्रास देऊन धमकी देत असल्याने भोसले यांनी घरातच गळफास घेत आत्महत्या केली. बेकायदा सावकारी करणार्‍या आरोपींच्या धमक्यांमुळे पतीने आत्महत्या केल्याचे भोसले यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मुंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक समीर करपे करत आहेत.

मुंढवा पोलिसांनी गावठी पिस्टल बाळगणाऱ्या आरोपीच्या आवळल्या मुसक्या…

मुंढवा पोलिस ठाणेचा अगळावेगळा पर्यावरण पुरक उपक्रम…

पुणे शहरात मोबाईल चोरांना पकडण्यात मुंढवा पोलिसांना यश…

कौतुकास्पद! मुंढवा पोलिसांनी वाचवला आत्महत्या करणाऱ्या युवकाचा जीव…

पुणे शहरात कुत्र्याचा मृत्यू, दोन डॉक्टरासह चार जणांवर गुन्हा दाखल…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!