समृद्धी महामार्गावर काळाचा घाला; युवक ठार, तिघे गंभीर…

वाशिम : समृद्धी महामार्गावर शनिवारी (ता. ११) मध्यरात्री वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या कारंजा टोलनाक्याजवळ कारला भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण ठार झाला असून, तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दिवाळीनिमित्त पुण्याहून वर्ध्याला गावी ४ युवक निघाले होते. समृद्धी महामार्गावरून जात असताना वाशिमच्या कारंजा टोल नाक्याजवळ नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर एक ट्रक उभा होता. नादुरुस्त असल्याने उभा करण्यात आलेला हा ट्रक कार चालकाला दिसला नाही. ट्रक जवळ येताच कार चालकाने दुसऱ्या लेनमधून गाडी घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी समृद्धी महामार्गावर सुरक्षा कठड्याला कार धडकली. धडकेनंतर कार पलटी होऊन अपघात झाला.

अपघातात कौस्तुभ मुळे (रा. वर्धा) हा युवक जागीच ठार झाला. तर अंकित गडकरी, कार्तिक निपोडे आणि संदेश गावडे हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे मुळे कुटुंबावर मोठे दुःखद संकट कोसळले आहे. अपघातामधील गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी अमरावतीच्या रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

समृद्धी महामार्ग अपघात प्रकरणी दोन आरटीओ अधिकाऱ्यांना अटक

समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू; पाहा मृत आणि जखमींची नावे…

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; कुटुंबावर काळाचा घाला…

समृद्धी महामार्गावर फोटो, व्हिडीओ काढाल तर तुरुंगात जाल…

समृद्धी महामार्गावर भीषण दुर्घटना; 18 जणांचा मृत्यू…

समृद्धी महामार्ग एक Live अनुभव अन् बरंच काही…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!