IPS अधिकाऱ्याचा पहिल्या पोस्टिंगसाठी जात असताना अपघाती मृत्यू…

बंगळूरू : कर्नाटकमधील हसन जिल्ह्यात आयपीएस (IPS) अधिकारी हर्ष वर्धन यांचा पहिल्या पोस्टिंगसाठी जात असताना अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ते २०२३ च्या बॅचचे कर्नाटक केडरचे आयपीएस अधिकारी होते. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत हर्ष वर्धन यांचा अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला.

हर्ष वर्धन हे मध्य प्रदेशचे रहिवासी होते. हर्ष वर्धन हे पोलिसांच्या वाहनाने होलेनरसीपूर येथे त्यांच्या पहिल्या पोस्टिंगसाठी ड्युटीवर जात होते. मात्र, पहिल्या पोस्टिंगसाठी जात असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. हर्ष वर्धन यांच्या अपघाती मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. हर्ष वर्धन यांनी २०२३ मध्ये यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवले होते. त्यानंतर त्यांची आयपीएस अधिकारी म्‍हणून निवड झाली होती.

आयपीएस अधिकारी म्हणून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर कर्नाटक केडरमध्ये हर्ष वर्धन यांना पहिली पोस्‍टिंग मिळाली. पोस्‍टिंग मिळाल्यानंतर हर्षवर्धन हे आपल्या ड्युटीसाठी जात होते. मात्र, पोस्‍टिंगसाठी जात असतानाच कर्नाटकच्या हसन जिल्ह्यात त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात हर्ष वर्धन यांचा जागीच मृत्‍यू झाला. गाडीचा अचानक टायर फुटला आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका घराला धडकली. ही धडक एवढी जोराची होती की गाडीचा संपूर्ण चक्काचूर झाला. तसेच गाडीत असलेल्या हर्ष वर्धन यांचा जागीच मृत्‍यू झाला. तसेच गाडीचा चालक देखील गंभीर जखमी झाला आहे.

पोलिसांनी सांगितले की, ‘हर्ष वर्धन हे सहायक पोलिस अधीक्षक म्‍हणून आपल्या पहिल्या पोस्‍टिंगसाठी कर्नाटकमधील हसन जिल्‍ह्यात निघाले होते. मात्र, रस्त्यातच त्यांच्या गाडीचा अपघात झाला. गाडीचा टायर फुटल्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात हर्ष वर्धन यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना येथील रुग्णालयात देखील दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.’

बॉलीवूड अभिनेत्री पहिल्याच प्रयत्नात बनली IPS अधिकारी…

नाशिकमध्ये लाल-निळ्या दिव्यांची गाडी अन् पोलिसांची वर्दी घालणारा तोतया IPS…

महिला IPS अधिकाऱ्यावर पोलिसांनीच ठेवली ‘नजर’; सात पोलिस निलंबीत….

Fake IPS झालेल्या मिथिलेश याच्या कहाणीत नवा ट्विस्ट…

सुंदरतेसोबत हुशारी! कोणत्याही क्लासेस शिवाय बनली IPS अधिकारी…

IPS अधिकाऱ्याचे कौतुक! पहिल्या पगाराचे काय केले पाहा….

पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…

‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…

खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!