पुणे! नवीन थारने कोकणात जाताना अपघातात सहा मित्रांचा मृत्यू; पाहा नावे…

पुणे : कोकणात जाताना ताम्हिणी घाटात थार कारचा भीषण अपघात झाला असून, सहा युवकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

मंगळवारी (ता. १८) रात्री हा अपघात झाला असून नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केल्यानंतर आज (गुरुवार) ही घटना उघडकीस आली. दरम्यान, 20 दिवसांपूर्वीच घेतलेली नवीन थार कार घेऊन हे पर्यटक कोकणात फिरायला निघाले होते. मात्र, या युवकांवर काळाने घाला घातल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

रायगड जिल्ह्यातल्या ताम्हिणी घाटामध्ये एक थार कार 500 फूट खोल दरीत कोसळल्याची दुर्घटना घडली. थार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार थेट दरीत कोसळली. या कारमधून सहा युवक प्रवास करत होते. बेपत्ता व्यक्तींच्या नातेवाईकांनी चौकशी केली असता त्यांचे लोकेशन रायगड आणि पुणे या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या ताम्हिणी घाटात सापडले. शोध सुरू असताना अपघात झाल्याचे समोर आले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करण्यात आला. प्रथमदर्शनी चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानेच कार दरीत कोसळली असावी. ड्रोनद्वारे परिसराची तपासणी सुरू असून मृतदेह आढळून आले आहेत. ते वर आणण्याचे काम सुरू आहे. बचाव पथक दोरखंड, क्रेन आणि इतर उपकरणांच्या मदतीने हे रेस्क्यू ऑपरेशन करत आहे, अशी माहिती माणगावचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी दिली.

मृत युवकांची नावे पुढीलप्रमाणे…
अपघातात शहाजी चव्हाण (वय २२), पुनित सुधारक शेट्टी (वय २०), साहील साधू बोटे (वय २४), श्री महादेव कोळी (वय १८), ओंकार सुनील कोळी (वय १८) आणि शिवा अरुण माने (वय १९) या सहा मित्रांचा मृत्यू झाला. हे सर्व युवक पुण्यातील उत्तमनगर परिसरातील रहिवासी होते.

ताम्हिणी घाटात कारचं सनरुफ फोडून दगड महिलेचा डोक्यात पडला अन् सोडला प्राण…

ताम्हिणी घाटात वऱ्हाडाच्या बसला अपघात; ५ जणांचा मृत्यू…

ताम्हिणी घाटात शाळेच्या सहलीच्या बसला अपघात; दोन महिलांचा मृत्यू…

पुणे! हिंजवडीत वडिलांच्या डोळ्यादेखत मुलीचा मृत्यू…

हृदयद्रावक! मेंढीला वाचवण्यासाठी सुरेखा पुढे झाली अन् भाऊही पळत आला…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!