
पुणे! युवकानं PMPML बस का पळवली? पोलिस तपासात धक्कादायक माहिती…
पुणे : पुणे शहरातील शिवाजीनगर येथील डेंगळे पुलावरून शनिवारी (ता. २५) दुपारी पीएमपीएमएल बस पळवून नेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, अटकेनंतर या आरोपीचे वर्तन विचित्र असल्याचे आढळल्याने पोलिसांनी त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले आहे. संबंधित युवक मानसिकदृष्ट्या स्थिर नसल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
शिवाजीनगर परिसरात उभी असलेली एक पीएमपी बस शनिवारी या तरुणाने पळवून नेली. डेंगळे पुलापासून सुरू झालेला हा थरार जंगली महाराज रस्तामार्गे थेट फर्ग्युसन कॉलेज रोडवरील गोखले चौकापर्यंत सुरू होता. भररस्त्यात बस सुसाट धावत असल्याचे पाहून नागरिक आणि पोलिसांची एकच धावपळ उडाली होती. अखेर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून या तरुणाला ताब्यात घेतले होते.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
शिवाजीनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला आरोपी मूळचा उत्तराखंड येथील आहे. तो पुण्यात कधी आणि कसा आला, याचा तपास सध्या सुरू आहे. मात्र, पोलिसांच्या प्रश्नांना तो विसंगत उत्तरे देत असल्याने आणि त्याचे मानसिक संतुलन ठीक नसल्याचे जाणवल्याने, त्याला ससून रुग्णालयातील मानसोपचार विभागात देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, युवकाने ज्या मार्गावरून बस पळवली, तो भाग पुण्यातील अत्यंत गजबजलेला परिसर आहे. जंगली महाराज रस्ता आणि एफसी रोडवर नेहमीच वाहनांची आणि पादचाऱ्यांची मोठी गर्दी असते. अशा वेळी अनुभव नसलेला आणि अस्थिर मानसिक अवस्था असलेल्या व्यक्तीच्या हातात बस असतानाही कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, यामुळे पोलिसांनी आणि पुणेकरांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
पुणे शहरात किरकोळ वादातून युवकाची सपासप वार करून हत्या…
पुणे शहरात सलूनमध्ये अंदाधुंद गोळीबार; पोलिसांनी जिवाची पर्वा न करता घातली झडप…
मनोहर मामाचा आणखी एक कारनामा समोर, पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून उचललं…
पुणे! लग्नासाठी चक्क पोलिस अधिकारी झाल्याचा बनाव! इम्प्रेशनसाठी लावले खोटे फ्लेक्स…
पुणे! लकडी पुलावरील त्या हत्येचा छडा; दोघांना बेड्या, धक्कादायक उलगडा…

