ड्रग माफिया ललित पाटील याच्या दोन मैत्रिणींना अटक; कारण…

पुणे : पुणे पोलिसांनी ड्रग माफिया ललित पाटील याच्या दोन मैत्रिणींना नाशिकमधून अटक केली आहे. नाशिकमध्ये रात्री ही कारवाई करण्यात आली आहे. ससूनमधून पळून जाण्यास ललितला या दोन मैत्रिणींनी मदत केल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

मुंबई पोलिसांनी ललित पाटील याच्या चेन्नईमधून मुसक्या आवळल्या. गेल्या 15 दिवसांपासून पुणे पोलिसांना गुंगारा देणारा ललित पाटील मुंबई पोलिसांच्या जाळ्यात सापडला. यानंतर पुणे पोलिसांच्या तपासाला वेग आला आहे. ललित पाटील याच्या अटकेनंतर पुणे पोलिसांचे एक पथक मुंबईला तर दुसरे पथक नाशिकला पोहचले आणि ललित पाटील याच्या दोन मैत्रीणींना अटक केली आहे. या दोघींनी पोलिस आज (गुरुवार) न्यायालयात हजर करणार आहेत. प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकम अशी दोघींची नावे आहेत.

ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर या दोघी ललित पाटील याच्या संपर्कात होत्या. तसेच त्याला पळून जाण्यासाठी या दोघींनींच मदत केल्याचे समोर आले आहे. ललित पाटील फरार असताना तो सातत्याने या दौन मैत्रिणींच्या संपर्कात होता. शिवाय, त्याने कमावलेला काळा पैसाही त्याने या दोघींकडे ठेवायला दिला होता. दोन्ही महिलांना पुण्यात आणण्यात आले असून दुपारी शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

ललित पाटील पुण्यातून पसार झाल्यानंतर मैत्रीण प्रज्ञा कांबळे हिला भेटायला नाशिकमध्ये आला. त्यानंतर अर्चना निकम या दुसऱ्या मैत्रीणीला देखील तो भेटला. या दोघांकडून पैसे घेऊन तो पुढे पसार झाला. ललित पाटील मेफेड्रॉन विक्रीतून मिळणाऱ्या पैशातील काही वाटा या दोघींवर खर्च करत होता. ललित पाटील दोन आठवडे फरार असताना या दोघींच्या सतत संपर्कात होता. ललित पाटील याचे पहिले लग्न झाले होते. मात्र त्याच्या पहिल्या बायोकोचा अपघाती मृत्यू झाला होता.

दरम्यान, ललित पाटीलच्या घरी ठाकलेल्या छापेमारीत पोलिसांना तीन किलो सोने सापडले होते. ललित पाटील याच्याकडे आणखी पाच किलो सोने असून हे सोने यांच्याकडे सापडण्याची शक्यता आहे.

ड्रग्ज माफिया ललित पाटील याला पकडण्यात पोलिसांना यश; कसा अडकला पाहा…

ससून ड्रग्ज प्रकरणात आणखी सात आरोपी निष्पन्न; ललित पाटील आणि सोने…

ललित पाटील याच्या मुसक्या आवळण्याची जबाबदारी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडे…

ललित पाटील नेमका पळाला कसा? याची होणार चौकशी…

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी दोघांना कोठडी; न्यायाधीशांनी खडसावले…

ललित पाटील याला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी मंत्र्याचा फोन…

ललित पाटील प्रकरणानंतर ससून रुग्णालयातून १२ कैदी पुन्हा येरवडा जेलमध्ये…

ड्रग्स मफिया ललित पाटील याला पळून जाण्यात मदत कोणाची पाहा…

ड्रग्स मफिया ललित पाटील याला मोटारीतून घेऊन जाणारा पोलिसांच्या ताब्यात…

ससून रुग्णालयातून आरोपी पसार, नऊ पोलिसांचे निलंबन; पाहा नावे…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!