भारत आणि बांगलादेश यांच्यात रंगणार सामना! वाहतुकीत बदल पाहा…

पुणे : पुणे शहरातील गहुंजे स्टेडिअम आज (गुरुवार) विश्वचषक 2023 मधील पहिला सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात रंगणार आहे. तब्बल 27 वर्षांनंतर क्रिकेट सामने पुण्यात होणार असल्याने अनेकजण उत्सुक आहेत. या मात्र गहुंजेला जाण्यासाठी रस्त्यांमध्ये बदल करण्यात आला आहे.

वाहतुकीचे बदल जाणून घ्या….
देहू रोड पोलीस स्टेशनने दिलेल्या माहितीनुसार आज वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. बदल पुढीलप्रमाणे…

मामुर्डी अंडर (मासुलकर फार्म) येथून कृष्णा चौकात जाण्यास मनाई.
पर्यायी मार्ग – लोढा येथून येणाऱ्या वाहनांनी मामुर्डी अंडरपास येथे उजवे वळण घेऊन बापदेव बुवा मार्गे कृष्णा चौकाकडे जावे.
मामुर्डी गावापासून मामुर्डी अंडरपास (मासुलकर फार्म) बाजूने प्रवेश बंदी.
पर्यायी मार्ग – या मार्गावरील वाहनांनी मामुर्डी जकात नाक्यामार्गे त्यांच्या इच्छित स्थळी जावे.
सामना संपल्यानंतर मामुर्डी अंडरपास बाजूने मामुर्डी अंडरपासकडे जाण्यासाठी प्रवेश साईनगर परिसरातील पार्किंग क्र. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 10, 11, 12, 13 मधील वाहनांसाठी बंद राहील.
वाहने साईनगर रोड ते सेंट्रल चौक मार्गे त्यांच्या इच्छित स्थळी जातील. पर्यायी मार्ग दोन- या मार्गावरील वाहने शितळा देवी-मामुर्डी जकात नाका मार्गे त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचतील.
अत्यावश्यक सेवा वाहने वगळून कार पासधारक वाहने आणि सर्व प्रकारच्या वाहनांसाठी गहुंजे ब्रिज Y जंक्शन मार्गे स्टेडियममध्ये प्रवेश प्रतिबंधित आहे.
मुंबईहून येणाऱ्या आणि स्टेडियमकडे जाणाऱ्या गाड्यांना देहू रोडने एक्स्प्रेस वेला लागून असलेल्या सर्व्हिस रोडने जाण्यास बंदी आहे.

PMPML बसेसचीदेखील सोय पुढीलप्रमाणे :
क्रिकेट चाहत्यांसाठी पीएमपीएमएलकडून पुणे मनपा भवन, कात्रज आणि निगडी टिळक चौक बस स्थानक या तीन ठिकाणांहून बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

क्रिकेट सामन्याचा बसेस सुटण्याचे ठिकाणे
19 ऑक्टोबर, 30 ऑक्टोबर, 1 नोव्हेंबर, 8 नोव्हेंबर या दिवशी बसेसची सोय करण्यात आली आहे.
पुणे मनपा बसस्थानक – दुपारी 11:00, 11:35, 12 :00 वाजता बस असणार आहे त्यासोबतच जाताना आणि येताना प्रत्येक व्यक्तीसाठी प्रत्येकी 100 रुपये तिकीट असणार आहे.
कात्रज बसस्थानक – दुपारी 11:00, 11:30 वाजता बस असणार आहे. त्यासोबतच जाताना आणि येताना प्रत्येक व्यक्तीसाठी प्रत्येकी 100 रुपये तिकीट असणार आहे.
निगडी बसस्थानक – दुपारी 12:00, 12:30 वाजता बस असणार आहे. त्यासोबतच जाताना आणि येताना प्रत्येक व्यक्तीसाठी प्रत्येकी 50 रुपये तिकीट असणार आहे.

दरम्यान, भारतात क्रिकेट विश्वचषकाला दमदार सुरुवात झाली आहे. या विश्वचषकातील पाच सामने गहुंजे स्टेडिअम (MCA Stadium, Gahunje) वर खेळण्यात येणार आहे.

दीड कोटी जिंकलेल्या पीएसआय सोमनाथ झेंडे यांच्यावर कारवाई…

करोडपती झालेल्या पोलिस उपनिरीक्षकाची होणार चौकशी…

पिंपरी-चिंचवडच्या पोलिसकाकाने जिंकले दीड कोटी रुपये; पण…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!