
शिक्षकाने स्वतःच्या जागी ठेवला रोजंदारीवर निवृत्त शिक्षक; वर्गातच जुगार…
पालघर : तलासरी तालुक्यातील सूत्रकार डोंगरपाडा या जिल्हा परिषद शाळेतील एक धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. एका शिक्षकाने स्वतःच्या जागी विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी रोजंदारीवर निवृत्त शिक्षकाला ठेवल्याचाही प्रकार घडला आहे.
शाळेत मुलांना शिकवायला शासनाचा गलेलठ्ठ पगार घ्यायचा पण शाळेत न जाता मुलांना शिकवायला मजुरीवर शिक्षक ठेवायचा, असा प्रकार तलासरी तालुक्यात उघड झाला आहे. वर्गातच विद्यार्थी चक्क पत्ते खेळत असल्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर शिक्षण विभागाचे धिंडवडे निघाले आहेत.
तलासरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा सूत्रकार डोंगरपाडा ही इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतची शाळा आहे. या शाळेत केवळ एक शिक्षक आणि चौदा मुले शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना शिकवायचा कंटाळा येत असल्याने गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या शिक्षकाने स्वतः घरी बसून 300 रुपये रोजंदारीवर एका निवृत्त शिक्षकाला शिकवायला ठेवले आहे. विद्यार्थी पुस्तके सोडून वर्गातच पत्ते घेऊन जुगाराचा डाव मांडत असल्याचे चित्र समोर आले आहे.
दरम्यान, नागरिकांच्या तक्रारीवरुन सूत्रकार डोंगरपाडा येथील शाळेवर बुधवारी (ता. 27) दुपारी भेट देऊन पाहणी केली. यावेळी शाळेत प्रमुख शिक्षक रवी कुमार सुभाष फेरे उपस्थित नसून ते गणपतीसाठी गावी गेल्याचे समजले. तसेच गावी जाताना मुलांना शिकवण्यासाठी 300 रुपये रोजंदारीवर रामा लोतडा या निवृत्त शिक्षकाला ठेवलेले दिसून आले आहे.
विद्यार्थिनीला मेसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला मारहाण; व्हिडिओ व्हायरल…
शिक्षिकेला फेसबुकवरील मैत्री पडली महागात…
शिक्षकाने ब्लॅकमेल करत असल्याचे स्टेटस ठेवून केली आत्महत्या…
धक्कादायक! अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून बलात्कार…
शिक्षणाच्या माहेरघरात लाच घेताना डीनला पकडले रंगेहात अन्…