
माजी आमदारास महिला अत्याचार प्रकरणात दोन दिवसांची पोलिस कोठडी…
अहमदनगर: श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना महिला अत्याचार प्रकरणी राहुरी पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी भानुदास मुरकुटे यांच्या विरोधात राहुरी पोलिस ठाण्यात काल गुन्हा दाखल झाला आहे. आमदार मुरकुटे यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
राहुरी तालुक्यातील एका महिलेने अत्याचार प्रकरणी सोमवारी संध्याकाळी माजी आमदार मुरकुटे यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. 2019 पासून मुंबई, दिल्ली तसेच जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे.
श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यावर आयपीसी कलम 376,328,418,506 अन्वये राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर पोलिस मुरकुटे यांना ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. मात्र कामानिमित्त मुंबई येथे गेले होते. ते रात्री उशिरा श्रीरामपूर शहरात दाखल झाले. रात्री साडेअकराच्या दरम्यान राहुरी पोलिसांनी मुरकुटे यांना त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत. तर या घटनेमुळे अहिल्यानगरमध्ये एकच खळबळ उडाली.
दरम्यान, माजी आमदार भानुदास मुरकुटे हे अनेक वर्षांपासून जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. ते अशोक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत त्याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते संचालक आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस त्यानंतर अलीकडच्या काळात भारत राष्ट्र समिती पक्षात दाखल झाले होते. त्यांनी श्रीरामपूरच्या पाणीप्रश्नावरून, अशोक कारखान्याच्या ऊस पळवापळवीच्या कारणावरून महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात या दोघांवरही हल्लाबोल केला होता.
महिला IPS अधिकाऱ्यावर पोलिसांनीच ठेवली ‘नजर’; सात पोलिस निलंबीत….
बोपदेव घाट प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार; शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी केली घटनेची पाहणी…
अजितदादा गटातील नेत्याला टोळक्याने धारदार शस्त्रांनी वार करुन संपवलं…
माजी आमदाराला अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी…
भीषण अपघात! आमदाराच्या पुतण्याने दुचाकीस्वाराला चिरडलं; आमदार म्हणतात…
माजी आमदाराच्या पहिल्या आणि दुसऱ्या पत्नीमध्ये तूतू-मैमै…
भाजप आमदार गणपत गायकवाड यांना पोलिस कोठडी…

