पोलिस आयुक्त रितेश कुमार त्यांची मकोका अंतर्गत ७७वी कारवाई…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरातील हडपसर पोलिस स्टेशन हद्दीतील स्वप्नील ऊर्फ बिट्या संजय कुचेकर (टोळी प्रमुख) व त्याचे इतर ०७ साथीदार यांचेविरुध्द मकोका अतंर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार त्यांची मकोका अंतर्गत केलेली सन-२०२३ या चालू वर्षातील ७७वी कारवाई आहे.
फिर्यादी (वय ५०, रा. मांजरी ब्रु पुणे) हे २४/०९/२०२३ रोजी त्यांचे राहते घरासमोर रात्रौ ०९/०० वा.चे. दरम्यान मांजराई मंदीरा समोरील रस्त्यावर संजय पवार यांचे लॉन्ड्री समोर मांजरी येथे गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक आली असताना स्पिकरचा आवाज फिर्यादी यांनी कमी करण्यास सांगितल्याचे कारणावरुन स्वप्नील ऊर्फ बिट्या संजय कुचेकर व त्याचे इतर ०७ साथीदार यांनी यातील फिर्यादी यांना लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने मारहाण केली. टोळी प्रमुख आरोपी स्वप्नील बिठया ऊर्फ स्वप्नील कुचेकर यांने फिर्यादी यांचे डोक्यात लोखंडी रॉडने जीवे ठार मारण्याचे उद्देशाने मारहाण करुन जखमी केले. तसेच त्याचे इतर आरोपीत यांनी त्यास पकडून ठेवून हाताने तसेच लाथा-बुक्क्यांनी मारहाण करुन आपले हातातील लोखंडी रॉड व लाकडी दांडके हवेत जोरजोरात फिरवून मोठ-मोठयाने धमक्या देऊन परीसरात दहशत माजवली.
फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादी वरून हडपसर पो.स्टे.गु.र.नं. १४५५/२०२३ भा.द.वि. कलम ३०७, ३२४, ३२३,५०४, ५०६,१४१,१४६,१४७,१४८,१४९, क्रिमिनल लॉ अमेंडमेट अॅक्ट कलम ७ महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्हयाच्या तपासा दरम्यान यातील निष्पन्न आरोपी
१) स्वप्नील ऊर्फ बिट्या संजय कुचेकर वय २३ वर्षे रा. मांजराई मंदीरा शेजारी मांजराईनगर मांजरी बु// ता. हवेली जि. पुणे (टोळी प्रमुख)
२) पंकज गोरख वाघमारे वय २८ वर्षे रा. बंटर शाळेजवळ गाडीतळ हडपसर पुणे. (टोळी सदस्य )
३) हर्षल सुरेश घुले वय २३ वर्षे रा. शिवाजी पुतळया शेजारी मांजरी बु// ता.हवेली जि. पुणे ( टोळी सदस्य) यांना दाखल गुन्हयात अटक करण्यात आली असून ०३ विधीसंघर्षीत बालक यांना ताब्यात घेण्यात आले आहे व यातील दोन पाहिजे आरोपी यांचा शोध सुरू आहे.
आरोपींचे पुर्व रेकार्ड ची पाहणी करता आरोपी स्वप्नील ऊर्फ बिट्या संजय कुचेकर (टोळी प्रमुख) व त्याचे साथीदारासह गुन्हेगारी टोळी तयार केली असून ते सर्व हडपसर, मांजरी, शेवाळवाडी लोणी टोल नाका या भागात त्यांचे टोळीचे वर्चस्व वाढविण्यासाठी तसेच इतर साथीदारांसह शरीराविरूध्दचे गुन्हे त्यामध्ये घातक शस्त्र बाळगुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, घातक शस्त्र बाळगुन दरोडा टाकणे, जबरी चोरी करणे, नागरीकांमध्ये दहशत निर्माण करणे, येणारे जाणारे लोकांना कोयते दाखवुन त्यांना दारु पिण्यासाठी दमदाटी करुन पैसे मागणे. छोटे व्यवसायिक व दुकानदार तसेच पथारीवाले यांना दमदाटी करुन त्यांचे मनामध्ये दहशत निर्माण करुन त्यांचेकडुन फुकट वस्तु घेऊन जाणे इतर असे गंभीर गुन्हे वारंवार करत असतात. त्यांचे दहशतीमुळे त्यांचे विरुध्द कोणीही तक्रार देण्यास पुढे येत नाही. तसेच त्याचे विरुध्द पुणे शहरातील वेगवेगळया पोलिस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेची माहिती मिळुन आली. त्याने त्याचे टोळीतील सदस्यांनी पुणे शहर हडपसर परिसरात मोठया प्रमाणात दहशत निर्माण केली आहे. यातील नमुद सदस्यांवर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्यांनी पुन्हा पुन्हा गुन्हे केलेले आहेत.
दाखल गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३(१)(ii),३(२),३(४) चा अंतर्भाव करणे कामी वरीष्ठ पोलिस निरीक्षक हडपसर पो स्टेशन पुणे रविंद शेळके यांनी पोलिस उपायुक्त परिमंडळ ०५ विक्रांत देशमुख यांचे मार्फतीने अपर पोलिस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर रंजनकुमार शर्मा यांना प्रस्ताव सादर केलेला होता. सदर प्रकरणाची छाननी करुन हडपसर पोलिस स्टेशन गु.र.नं. १४५५/२०२३ भा.द.वि. कलम ३०७, ३२४, ३२३, ५०४,५०६, १४१, १४६,१४७,१४८,१४९, क्रिमिनल लॉ अमेंडमेट अॅक्ट कलम ७ महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७(१) (३) सह १३५ प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हयांमध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii). ३ (२). ३ (४)चा अंतर्भाव करण्याची अपर पोलिस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर रंजनकुमार शर्मा यांनी मान्यता दिलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढिल तपास मा. सहा पोलिस आयुक्त हडपसर विभाग पुणे शहर अश्वीनी राख हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त, पुणे शहर संदिप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर रंजनकुमार शर्मा, पोलिस उप-आयुक्त परीमंडळ ५ पुणे शहर, विक्रांत देशमुख, सहा. पोलिस आयुक्त, हडपसर विभाग पुणे शहर, अश्विनी राख, यांचे मार्गर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक हडपसर पोलिस स्टेशन पुणे शहर, रविंद शेळके, पोलिस निरीक्षक (गुन्हे), विश्वास डगळे, पोलिस निरीक्षक (गुन्हे), संदिप शिवले सहा. पोलिस निरीक्षक सारिका जगताप, सहा. पोलिस निरीक्षक सचिन दाभाडे, निगराणी पथकातील पोलिस अंमलदार प्रविण शिंदे, गिरीश एकोर्गे, महेश उबाळे, राजश्री खैरे वसीम शेख, बाबा शिंदे, अशोक आंधारे सर्व हडपसर पोलिस स्टेशन पुणे शहर यांनी कारवाई केली आहे.
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे पोलिस आयुक्तालयाचा कार्यभार स्वीकारल्या नंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारीक लक्ष देवुन शरीराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व समाजामध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलिस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश दिले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मकोका अंतर्गत केलेली सन-२०२३ या चालु वर्षातील एकूण ७७ वी कारवाई आहे.
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मकोका अंतर्गत ७४वी कारवाई…
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ७१ वी कारवाई; पाहा आरोपींची नावे…
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे एमपीडीए कारवाईचे अर्ध शतक…
ड्रग माफिया ललित पाटील पुणे पोलिसांच्या ताब्यात…
डेटींग ऍपद्वारे ग्राहकांना आकर्षीत करणारी जोडी सामाजिक सुरक्षा विभागाच्या ताब्यात…
पुणे-बंगळुरू महामार्गावर पोलिसकाकासह तिघांचा जागीच मृत्यू…
पुणे शहरात बुलेट सायलेन्सरमधून आवाज काढणाऱ्यांवर कारवाई…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…