अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीने घेतला जगाचा निरोप…

मुंबई : अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घरावर गोळीबार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या एका आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. आज (बुधवार) सकाळी 11.30 ते 12 वाजण्याच्या सुमारास पोलिस कोठडीची पाहणी करण्यास गेले असता आरोपीने गळफास घेतल्याचे समोर आले.

सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. त्यापैकी दोघांनी सलमानच्या घरावर गोळीबार केला होता. या आरोपींना गुजरातमधून अटक करण्यात आली होती. तर, या आरोपींना पिस्तुल पुरवल्याप्रकरणी पंजाबमधून सोनू चंदर आणि अनुज थापन या दोघांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी अनुज थापन याने आज तुरुंगात चादरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!

सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गु्न्हे शाखेने 25 एप्रिल रोजी सोनू चंदर (37 वर्ष) आणि अनुज थापन (32 वर्ष) यांना अटक केली होती. सोनू हा शेती करतो आणि त्याचे किराणा दुकानही आहे. तर, अनुज थापन ट्रक हेल्पर म्हणून काम करतो, तो लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या संपर्कात होता, त्याच्यावर खंडणी आणि शस्त्रास्त्र कायद्याचे गुन्हे दाखल होते.

दरम्यान, 14 एप्रिल रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकीस्वारांनी अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केला होता. मुंबई पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. या घटनेची जबाबदारी तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याचा भाऊ अनमोल बिष्णोई याने घेतली. घटनास्थळापासून काही अंतरावर पोलिसांना गुन्ह्यात वापरलेली दुचाकी सापडली होती. सीसीटीव्ही फूटेजमध्ये पोलिसांना आरोपींचे चेहरे दिसले. या घटनेच्या 72 तासांच्या आत मुंबई पोलिसांनी गुजरातमधून आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या.

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणारे अटकेत; चौकशीत धक्कादायक खुलासा…

सलमान खानच्या घराबाहेर फायरिंग करुन गेले वांद्रे रेल्वे स्टेशनवर; ओळख पटली…

अभिनेता शाहरुख खानला सरकारने पुरवली Y+ स्कॉट सुरक्षा; कारण…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!