मॉडेलने घातला अनेक युवकांना लाखो रुपयांचा गंडा…

बंगळूरूः एका मॉडेलने अनेकांना तिच्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकवून लाखो रुपयांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. श्रीमंत मुलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून लुटत असल्याची माहिती चौकशीदरम्यान पुढे आली आहे.

बंगळुरूमधील पुत्तेनहल्ली पोलिस ठाण्यात यासंदर्भात तक्रार आली होती. पोलिसांनी तपास करत या मॉडेल सह तिच्या तीन साथीदारांना अटक केली आहे. मुलांना ती मोबाईल नंबर देत असत तसेच त्यांच्यासोबत अश्लिल चॅटिंग करायची. नेहा असे या मॉडेलचे नाव आहे. ती या टोळीची मुख्य सुत्रधार असल्याचे प्राथमिक तपासात समोर आली आहे. तिने अनेक मुलांना घरी बोलावले होते.

शिवाय, युवकांना शारीरिक संबंध ठेवण्याचे आमिष दाखवून घरी बोलवायची नंतर ती मुलांना धमकावून पैसे मिळवत होती. दीड वर्षांपासून ही टोळी सुरू होती, असा पोलिसांचा दावा आहे. या टोळीने आतापर्यंत 50 हून अधिक जणांना लुटले आहे. यामध्ये 35 लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक झाली आहे. यामुळे पोलिसांनी याकडे लक्ष देऊन आरोपींना अटक केली आहे. ही टोळी श्रीमंत मुलांना लक्ष करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन…

अभिनेत्रीवर बलात्कार आणि मारहाण केल्याप्रकरणी एकाला अटक…

हनी ट्रॅपप्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!