हिंजवडी पोलिसांनी सापळा रचून पकडला १८ लाख रुपयांचा गुटखा…
पुणे (सुनिल सांबारे): हिंजवडी पोलिसांनी तब्बल १८ लाख रुपयांचाचा गुटखा पकडला असून, दोन जणांना ताब्यात घेतले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
गुन्हे शोध तपास पथकातील सपोनि राम गोमारे यांना ३/११/२०२३ रोजी बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दोन जण बंगलोर-मुंबई हायवेने पुनावळेचे दिशेने एक पांढऱ्या रंगाची महिंद्रा पिकअप मधून प्रतिबंधीत तंबाखुजन्य गुटखा व पान मसाला वगैरे पदार्थांची विक्री करण्यासाठी घेऊन जाणार आहेत. राम गोमारे यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पौळ यांना नमुद बातमीची हकीकत सांगून सपोनि गोमारे यांनी सहा. पो. फौ. मारणे, पो. हवा १५७६ नरळे, पो.ना १९०१ चव्हाण, पो.ना. १७४८ गडदे, पोशि २२८४ पालवे, व पोशि २४०० शिंदे असे पोलिस स्टाफसह बंगलोर मुंबई हायवे येथे सापळा लावला. वर्णनाप्रमाणे पिकअप महिंद्रा गाडी न्यु सागर हॉटेल समोर, बंगलोर मुंबई हायवे, ताथवडे, पुणे येथून जाताना दिसल्याने पोलिस स्टाफसह सदर गाडी अडवली.
मोटारीमधील १) वाकाराम ठाकरारामजी जाट (वय १९ वर्ष, रा. बालाजी ट्रेडींग कंपनी, जयभवानी हॉटेल जवळ, खालुंब्रे, ता. मावळ, जि. पुणे मुळ गाव मु.पो. शेंडवा, ता. गोरामणी, जि. बाडनेर राजस्थान), २) बोगाराम सुखराम बिष्णोई (वय १९, रा. सदर) हे दोघे मालाबाबत उडवाडवीची उत्तरे देऊ लागले. सदर गाडीची पाहणी केली त्यामध्ये विमल कंपनीचे गुटख्याचे बॉक्स व सुंगधी तंबाखूचे पाऊच मिळून आले. सदर माल त्याने कोणाकडून आणला या बाबत त्याचेकडे चौकशी करता त्याने सदरचा माल हा पाहिजे आरोपी सुजीत खिंवसरा (रा. कोथरूड, पुणे) याने विक्रीसाठी आणून दिल्याचे सांगीतले. महींद्रा पिकअप वाहन व प्रतिबंधित तंबाखुजन्य गुटखा पदार्थ असा एकूण १८, १८,००० रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करुन आरोपी क्रमांक १ व २ यांना हिंजवडी पोलिस ठाणे गु.र.नं. १२४३ / २०२३ भा.द.वि. कलम ३२८, २७२, २७३, १८८, ३४ या गुन्हयात दिनांक ०३/११/२०२३ रोजी २१/३० वा. अटक करण्यात आली आहे. आरोपी क्रमांक ३) सुजीत खिंवसरा (रा. कोथरुड) याचा हिंजवडी पोलिस शोध घेत आहेत.
मुखांचे कर्करोग व इतर विकार होऊन शारिरीक हानी होणारे शासनाने प्रतिबंधित केलेले तंबाखुजन्य गुटखा व पानमसाला पदार्थाचा साठा करून त्याची विक्री करीता नेत असलेला गुटखा पकडुन त्यातील आरोपींवर कारवाई करून हिंजवडी गुन्हे शोध पथकाने उल्लेखनिय कामगिरी केली आहे.
सदरची कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, डॉ. संजय शिंदे, सह पोलिस आयुक्त पिंपरी चिंचवड, वसंत परदेशी अपर पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड, डॉ. काकासाहेब डोळे, पोलिस उप आयुक्त परि २, पिंपरी चिंचवड विशाल हिरे, सहा. पोलिस आयुक्त, वाकड विभाग पिं चिं यांचे मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, श्रीराम पौळ, सुनिल दहिफळे पोलिस निरीक्षक (गुन्हे), सोन्याबापु देशमुख पोलिस निरीक्षक (गुन्हे), तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक सागर काटे, राम गोमारे, सहा पो. फौजदार बंडू मारणे, बाळकृष्ण शिंदे, नरेश बलसाने, बापुसाहेब धुमाळ, पोलिस हवालदार योगेश शिंदे, कुणाल शिंदे, कैलास केंगले, विक्रम कुदळ, अरूण नरळे, पोलिस अंमलदार रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, कारभारी पालवे, दत्ता शिंदे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, सागर पंडीत, यांनी केली आहे.
हिंजवडी पोलिस स्टेशन हद्दीतून बेपत्ता व्यक्तीचा खून अनैतिक संबंधातून…
हिंजवडीत दुचाकीस्वाराच्या शरीरावर तब्बल दहा मिनिटे ट्रकचे चाक…
पिंपरी-चिंचवडच्या हद्दीत ३१ किलो गांजाचा मोठा साठा जप्त…
वाकड पोलिसांनी अवैध रित्या गॅसची चोरी प्रकरणी तिघांना घेतले ताब्यात…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!