सराईत गुंड मध्य रात्री मैत्रिणीला भेटायला गेला अन् झाडल्या गोळ्या…

छत्रपती संभाजीनगर : एका सराईत गुंड मध्यरात्री बाराच्या सुमारास मैत्रिणीला भेटायला गेला होता. यावेळी आरोपीने तिच्यावर गोळीबार केला आहे. या हल्ल्यात युवती गंभीर जखमी झाली आहे. गोळीबाराच्या या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तातडीने आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

सैय्यद फैजल उर्फ तेजा असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तेजा हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खूनाचा प्रयत्न, बलात्कार, चोरी आणि अमली पदार्थ तस्करी संदर्भात विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपी तेजा हा सोमवारी (ता. ११) रात्री उशिरा आपल्या मैत्रिणीला भेटायला गेला होता. यावेळी त्याने मैत्रिणीवर गोळीबार केला. यातील एक गोळी मैत्रिणीच्या हाताला लागली आहे. दैव बलवत्तर म्हणून युवती थोडक्यात बचावली आहे. राखी मुरमरे (वय 22) असे जखमी मैत्रिणीचे नाव आहे. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून हा हल्ला नेमका कुठल्या कारणावरून झाला हे अद्याप कळू शकलेले नाही. दरम्यान, पोलिसांनी या घटनेची दाखल घेत अधिक तपास सुरु केला आहे.

तेजा हा सुरुवातीला भुरटा चोर होता. तो लहान मोठ्या चोऱ्या करायचा. मात्र नंतर तो काही सराईत गुन्हेगारांच्या संपर्कात आला आणि तोही सराईत बनला. २०२१ मध्ये एका अल्पवयीन मैत्रिणीने तेजावर बलात्काराचा गुन्हा देखील दाखल केला होता. त्याने चाकुने तिला भोसकल्याची देखील नोंद आहे. याशिवाय त्याने संभाजीनगरमध्ये एका रिक्षा चालकावर कोयत्याने हल्ला देखील केला होता. याच सराईत गुंडाने मैत्रिणीवर गोळीबार केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

गर्भवती पत्नीला डोळे बंद करायला लावले अन् केला विश्वासघात…

पुणे जिल्ह्यात भाविकांच्या वाहनाला अपघात; ८ महिलांचा मृत्यू; पाहा नावे…

पुणे! रक्षाबंधनाला भाऊ रिकाम्या हाती आला तर जीवे मारु; स्नेहाने आयुष्य संपवलं…

नागपूर हादरलं! कुख्यात गुंडाला कुऱ्हाड अन् बेसबॉल बॅटने वार करत जागेवरचं संपवलं…

पुणे! प्रांजल खेवलकरांनी अनेकदा मुलींना बोलावले; रोहिणी खडसे म्हणाल्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!