बार्शी पोलिसांनी ४८ तासांत उघड केला चोरीचा तपास…

बार्शी, सोलापूर (आकाश वायचळ): बार्शी शहरातील जनार्दन नगर येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या चोरीचा तपास उघड करण्यात बार्शी शहर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी चोरट्याला अटक केली असून, मुद्देमाल जप्त केला आहे.

30 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:30 ते दुपारी 2:00 वा चे दरम्यान जनार्धन नगर येथे अजय उत्तम सावंत यांच्या राहते घराचे कुलूप तोडून घरातील कपाटातून 18.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने व 20,000/-रु रोख रक्कम असा एकूण 2,14,000/- रू किंमतीचा मुददेमाल कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेल्याची फिर्याद दाखल करण्यात आली होती.

फिर्यादीचे अनुषंघाने पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, पोलिस उपनिरीक्षक महेश गळगटे व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अंमलदारांनी घटनास्थळास भेट दिली होती. पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी लागलीच दोन पथके तयार करून त्यांना योग्य त्या सुचना देवून सदर गुन्हयाचे तपासाचे अनुषंघाने रवाना केले. सदर गुन्हयाचे तपासादम्यान गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदरची घरफोडी ही आप्पा बाळू पवार याने केली आहे. सदर बातमीच्या अनुषंघाने आप्पा उर्फ आप्पासाहेब बाळू पवार (वय ६२ वर्षे, रा. कारंबा, ता. उत्तर सोलापूर) यास ताब्यात घेवून त्याचे कडे सदर गुन्हयाचे अनुषंघाने तपास केला असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, सखोल तपास केला असता त्याने गुन्हयाची कबूली दिली.

दरम्यान, सदर गुन्हयातील एकूण 22.5 ग्रॅम वजनाचे सुमारे 82,000/-रु किंमतीचे सोन्याचे दागीने चोरट्याकडून हस्तगत करण्यात आले. आरोपी सध्या पोलिस कोठडीत असून सदरचा गुन्हा घडलेपासून ४८ तासात उघडकीस आणला आहे, गुन्हयाचा तपास पोलिस उपनिरीक्षक महेश गळगटे हे करत आहेत.

सदरची कामगीरी ही सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधिक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, सपोनि दिलीप ढेरे, पोसई गळगटे, तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोफौ / अजित पोहेकॉ / ६६५ रेवणनाथ भोंग, पोहेकॉ / १६६७ अमोल माने, पोना / ११६२ मनिष पवार, पोना / ९१२ वैभव ठेंगल , पोकॉ/ १७४८ ज्ञानेश्वर घोंगडे, पोकॉ/८५६ अर्जुन गोसावी, पोकॉ/ ४५७ रविकांत लगदिवे, पोकॉ/ ७८७ अविनाश पवार, पोकॉ/२१११ अंकुश जाधव, पोकॉ/ २२०५ रोहीत बागल, पोकों/ १९७४ सचिन देशमुख, पोकों/२०० राहूल उदार, पोकों/ ५९५ इसामिया बहीरे यांनी केली आहे.

कौतुकास्पद! कोल्हापूर परिक्षेत्रात सोलापूर ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी…

पोलिसकाकाची घराच्या अंगणात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या…

पैशासाठी आईचा खून करणाऱ्या आरोपी मुलास जन्मठेप…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!