
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पुन्हा हल्ला…
वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पुन्हा गोळीबार झाला असून, सुदैवाने ट्रम्प या गोळीबारातून वाचले असून ते सुरक्षित आहेत. रविवारी दुपारी फ्लोरिडातल्या ट्रम्प इंटरनॅशनल गोल्फ कोर्सजवळ ही घटना घडली. ट्रम्प यांच्यावर जवळून गोळ्या झाडण्यात आल्या. एफबीआयने या घटनेचा तपास सुरू केला आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जसजशी अंतिम टप्प्यात येत आहे तसतसे आरोप प्रत्यारोप वाढत चालले आहेत. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उप राष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्यात राष्ट्राध्यक्षपदासाठी लढत होत आहे. एफबीआयने स्पष्ट केले की, गोळीबाराची घटना ही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकनचे उमेदवार असलेल्या ट्रम्प यांना टार्गेट ठेवून करण्यात आली आहे. हत्येचा हा दुसरा प्रयत्न अयशस्वी ठरला. याआधीही ट्रम्प यांना रॅलीत मारण्याचा प्रयत्न झाला होता.
गोळीबाराच्या घटनेवर ट्रम्प म्हणाले, ‘गोळीबाराने घाबरणार नाही. कोणत्याही परिस्थितीत सरेंडर करणार नाही. अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने सांगितलं की, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. घटना रविवारी (ता. १५) दोन वाजता घडली. हल्लेखोराच्या टार्गेटवर डोनाल्ड ट्रम्प हेच होते.
Video: डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार; हल्लेखोराचं उडवलं डोकं…
Video: कारमध्ये रोमान्स सुरु असतानाच गिअरला लागला धक्का अन्…
नेपाळमध्ये जळगावच्या पर्यटकांची बस नदीत कोसळली; पाहा अपघातग्रस्तांची नावे…
हनिमूनच्या रात्री इमारतीवरून नग्नावस्थेत पडून नवरीचा मृत्यू…

