Video: पाकिस्तानमधील गरिबी; गाढवाला काय करावं लागतंय पाहा…

कराची (पाकिस्तान) : पाकिस्तानमधील आर्थिक स्थिती ढासळली असून, सर्वसामान्य नागरिकांना महागाईला सामोरे जावे लागत आहे. पाकिस्तानमध्ये सध्या पेट्रोलचा दर ३०० रुपयांवर गेला आहे. यामुळे वाहतुकीसाठी गाढवांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. पाकिस्तामध्ये सध्या वीज सुध्दा कमी प्रमाणात उपलब्ध आहे.

पाकिस्तानमधील महागाई इतकी वाढली आहे की, सामान्य माणसाचं जगणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानची लोकं उपाय शोधत आहेत. पाकिस्तानमध्ये सध्या वीज नसल्यामुळे एका व्यक्तीनं जुगाड केला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाकिस्तानमध्ये अनेक ठिकाणी वीज कपात केली जात आहे. उष्णतेपासून बचाव होण्यासाठी एकाने जुगाड केले आहे. संबंधित व्हिडीओ पाहून तुम्हाला सुध्दा आनंद होईल.

व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एका मोकळ्या जागेत गोलाकार पद्धतीने खाटा लावल्या आहेत. त्यांच्या मधोमध एक गाढव फिरत आहे. नागरिकांनी लाकूड आणि गाढवाच्या मदतीने एक पंखा तयार केला आहे. त्यामध्ये गाढव गोल-गोल फिरत आहे. त्यावेळी पंखा सुध्दा गोल फिरत आहे. नागरिक तिथं बसून आणि झोपून त्याची मजा घेत आहेत. असा पंखा प्रथमच तयार करण्यात आल्याचा दावा, तेथील नागरिकांनी केला आहे.

दरम्यान, संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर @dskaswa नावाच्या खात्यावरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटिझन्स प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

Video: पाकिस्तानी महिला सीमा हैदर हिचा नवीन व्हिडिओ समोर…

Video: अंजूने पाकिस्तानातून अरविंदला फोन करून केली शिवीगाळ…

Video: चिनी-पाकिस्तानी युवतीची भररस्त्यात हाणामारी…

पाकिस्तानने अभिनंदन यांना दिलेल्या चहाचं बिल केले व्हायरल…

पाकिस्तानात मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकाला फाशीची शिक्षा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!