वर्धा सायबर पोलिस स्टेशन मार्फत फसवणुकीचा गुन्हा उघड…

वर्धा (उमेशसिंग सुर्यवंशी): पोलिस अधिक्षक नुरुल हसन यांनी पोलिस अधिक्षक कार्यालय वर्धा येथे सायबर पोलिस स्टेशनची स्थापना केली आहे. महिनाभरात सदर गुन्ह्यांचा छडा लावण्यात सायबर पोलिस स्टेशन ला यश प्राप्त झाले आहे.

10/06/2023 रोजी फिर्यादी ही घरी हजर असताना फिर्यादी यांना त्यांचे मोबाईलवर कॉल आला. आपले पार्सल मध्ये 6 किलो कापड, 5 पासपोर्ट, 6 क्रेडीट कार्ड व 140 ग्रॅम एम. डी. ड्रग्स नावाचे अंमली पदार्थ सापडले आहे, आपण सायबर पोलिसांशी बोला असे सांगून भिती दाखवून व धमकावून फिर्यादीला वेगवेगळे कारण सांगुन वेगवेगळया अंकाऊंटमध्ये एकूण 247,776 रुपयांची फसवणूक केली, अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्टवरुन दिनांक 27/06/2023 रोजी सायबर पोलिस स्टेशन वर्धा येथे अप क्र. 01/2023 कलम 419, 420 भादवि सहकलम 66 (ड) माहिती तंत्रज्ञान कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्हयाचा संपुर्ण तांत्रीक पद्धतीने तपास केला असता व संपुर्ण तांत्रीक बाबींचे विश्लेषण करुन सदरचे आरोपी हे नांदेड व औरंगाबाद येथे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिस अधीक्षकांच्या आदेशान्वये सायबर पो.स्टे मार्फत एक पथक तयार करुन दिनांक 17/07/2023 रोजी सदरचे पथक हे नांदेड येथे पोहचून आरोपी अंबादास जनार्धन कांबळे (वय 35 वर्ष रा. विष्णु नगर, नांदेड यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने त्याचे सोबत आरोपी अनिल संभाजी निकम (वय 49 वर्ष रा. द्वारकाधीश नगर, औरंगाबाद) हासुद्धा असल्याचे सांगितल्याने सदरचे पथक नांदेड येथून तात्काळ औरंगाबाद येथे पोहचून आरोपीचा शोध घेतला. आरोपी अनिल संभाजी निकम यास ताब्यात घेतले. सदर आरोपींकडून गुन्हयात वारण्यात आलेले बॅंक खात्याचे 1 चेक बुक, 2 मोबाईल, 7 एटीएम कार्ड असा एकुण 20,000 / – रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींच्या बॅक खात्याचे निरीक्षण केले असता त्यांच्या खात्यात कोटींची उलाढाल झालेली असल्याचे निदर्शनास आलेले आहे. आरोपींकडून महाराष्ट्रासह इतर राज्यातील गुन्हे उघड येण्याची शक्यता आहे.

सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कांचन प. पांडे, सायबर पोलिस स्टेशन वर्धा यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात व निर्देशाप्रमाणे पोलिस अंमलदार वैभव कट्टोजवार, निलेश तेलरांधे, रंजीत जाधव, अनुप राऊत, अमित शुक्ला, अनुप कावळे, प्रतिक वांदीले, मपोशि लेखा राठोड सर्व सायबर पोलिस स्टेशन वर्धा यांनी केली आहे.

सायबर फ्रॉड आणि जामतारा एक सत्य…

वर्धा पोलिसांना सर्वोत्कृष्ट गुणात्मक अन्वेषणासाठीचे बक्षिस…

महिलेला कॅबमधून प्रवास करताना मित्रासोबत बोलणं पडले महागात…

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!