महिलेला कॅबमधून प्रवास करताना मित्रासोबत बोलणं पडले महागात…
बंगळुरू : कॅबमधून प्रवास करत असताना एक महिला आपल्या एका मित्रासोबत साखगी आयुष्याबाबत बोलत होती. कॅब चालकाने महिलेचे बोलणे ऐकले आणि तब्बल ८२ लाख रुपयांना गंडा घातला. महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी किरण कुमार (वय 35) याला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.
एका महिलेने इंदिरानगरवरून बनासवाडीला जाण्यासाठी कॅब बुक केली होती. महिला कॅबमध्ये बसल्यानंतर प्रवासादरम्यान आपल्या एका मित्रासोबत तिच्या साखगी आयुष्याबाबत गप्पा मारत होती. ती फोनवर तिची वैवाहिक स्थिती आणि घटस्फोट याबाबत चर्चा करत होती. हे बोलणे कॅब चालकाने चोरून ऐकले. त्यानंतर या कॅब चालकाने सोशल मीडियावर या महिलेचा आणि तिच्या पतीचा शोध घेतला. तो या महिलेला धमकी देऊ लागला.
कॅबमध्ये त्या महिलेचे जे बोलणं सुरू होते, ते बोलण आपण तुझ्या पतीला सांगू, अशी धमकी कॅब चालकाने या महिलेला दिली. गप्प राहण्यासाठी त्याने तिच्याकडे पैशांची मागणी केली. कॅब चालकानं संबंधित महिलेकडून तब्बल 20 लाख रुपये रोख आणि 62 लाखांचे दागिने असा ऐकूण 82 लाखांचा ऐवज उकळला आहे. अखेर या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मोबाईलवर ‘एनी डेस्क’ अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले अन्…
युवकाला दिली अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी अन्…
सायबर फ्रॉड आणि जामतारा एक सत्य…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…