सायबर फ्रॉड आणि जामतारा एक सत्य…

(उमेशसिंग सुर्यवंशी – पोलिसकाका)
हल्लीच्या काळात सायबर फ्रॅाड म्हणजे खेळच झालाय. कुनीतरी खेळवतं पण त्याची ना ओळख ना पाळख तरी आपन त्याच्यावर विश्वास ठेऊन स्वतःची आर्थिक फसवणुक करुन घेतो. तुम्हाला बॅंकेकडून फसवणूकीचे जे फोन येतात ज्या गावातून येतात ते गाव म्हणजे जामतारा येथूनच आलेले असतात…

नेटफ्लिक्सवर जामताडा (jamtara) नावाची एक वेब सिरीज आहे. भारतातल्या एका गावावर असणारी ही सिरीज बघावी अशीच आहे. पण प्रत्यक्षात तूम्ही या गावावर असणारी डॉक्युमेंटरी पहाल आणि बातम्या वाचाल आणि सिरीजसोबत कंम्पेअर कराल तर सिरीज हिमनगाचे फक्त टोक वाटेल. प्रत्यक्षात हा भाग त्याहून अधिक दलिंदर प्रकारातला आहे. जामतारा झारखंड राज्यातला भाग आहे. नावाचा जिल्हा. वास्तविक आपल्या इकडच्या एका तालुक्याच्या गावापेक्षा छोट गाव आहे. चारी बाजूला जंगल, नद्या, दलदलीचा प्रदेश, छोट्या छोट्या टेकड्या असणारा हा भाग. या भागाच दूसरं वैशिष्ट म्हणजे देशभरातल्या एकूण सायबर क्राईम पैकी ८० टक्के सायबर क्राईम इथून ऑपरेट केले जातात. हा याच ग्रामीण,अर्धशिक्षित भागातून सायबर क्राईम होतं असतात.

काय आहे हे जामतारा प्रकरण…?
देशभरात साईबर क्राईम होतात त्यापैकी ८० टक्के क्राईम इथून ऑपरेट केले जातात. इथल्या घराघरात हा खेळ चालतो. बाप आणि पोरगा. आई आणि पोरगं, सख्खे भाई, संपुर्ण कुटूंब या फ्रॉड करण्याच्या धंद्यात गुंतलेले असतात. त्यासाठी भांडवल म्हणजे हजारो बोगस सिम कार्ड. देशभरातील मोबाईल क्रमांकाची एक पानभर यादी आणि फक्त एक मोबाईल इतक्यावर हा बिझनेस चालतो. पुर्वी घरात बसूनच काम केलं जात होतं. पण पोलिसांच्या रडारवर आल्यानंतर दोन-चार जणांच्या टोळक्याने जंगलात बसून हा खेळ चालू केला आहे. पोलिस शोधायला आल्याची टिप मिळाली की जंगलात लपण्याचा फायदा घेता येतो. त्यामुळे इथले चोर कधीच पोलिसांच्या तावडीत सापडत नाहीत. त्यामुळेच कितीही सर्च ऑपरेशन राबवली तरी हा खेळ मात्र बिनबोभाटपणे चालू आहे.

याची खरी पद्धत कशी असते ?
मोबाईल वरुन फोन केला जातो. आपल्याला देखील अनेकदा फोन आला असेल की, आपलं सिम कार्ड ब्लॉक झालं आहे. सुरू करायचे असल्यास आम्ही सांगतो त्या त्या गोष्टी करा. हे फोन इथूनच देशभरात केले जातात. काय करतात तर आपलं सिमकार्ड ब्लॉक करण्यात आलं आहे. सुरू करायचं आहे का अस विचारण्यात येतं. आपण हो म्हणताच आपल्या सिमकार्डवरचा नंबर विचारला जातो. त्यानंतर CVV नंबर मागितला जातो. २०१४ व त्यापुर्वी अर्थात ऑनलाईन ट्रान्सेक्शन करण्यासाठी टू फॅक्टर सिस्टिम नव्हती.म्हणजे तुम्ही कन्फर्मेशन देण्यासाठी तेव्हा मोबाईलवर OTP क्रमांक येत नव्हता. अशा काळात या प्रकारे फक्त कार्डचे डिटेल्स घेवून तुमच्या नावाने पैसे काढले जात होते त्यानंतर देखील OTP सांगा म्हणून प्रश्न विचारला जातो. बॅंकेतून फोन आहे म्हणल्यानंतर अनेकजण बिंनधास्तपणे नंबर सांगून मोकळे होतात आणि काही क्षणात तुमच्या अकाऊंटवरती एक मोठ्ठा शून्य येतो.

फ्रॅाड झाल्यावर हे पैसे कुठे जातात?
तुम्हाला फसवून ट्रान्सफर करण्यात आलेले पैसे जातात ते जामतारा या गावातल्या फ्रॉड व्यक्तिच्या अकाऊंटवर. पण ते थेट जात नाहीत. असा फोन करणारे आपला अकाऊंट नंबर देत नाहीत. ते काय करतात तर इथल्याच माणसांसोबत कमिशन बेसिसवर काम करतात. त्यांच्या अकाऊंटवर पैसे फिरवतात. त्याला वीस टक्के आणि आपणाला ८० टक्के घेतात. दूसऱ्याच्या अकाऊंटचा वापर फक्त पोलिस आपल्यापर्यन्त पोहचू नये म्हणून केला जातो. पुढच्या माणसाला पण २० टक्के घरबसल्या मिळत असल्याने तो खूषच असतो.

जामतारा पॅटर्न कधी अस्तित्वात आला…
प्रत्यक्षात इथे हा खेळ कधीपासून चालू आहे हे पोलिसांना पण ठामपणे सांगता येत नाही. पण पाच ते सात वर्षांपासून हे सगळं चालू झालं. जामतारा हे धनबाद कोलकत्ता पटना रांची अशा त्रिकोणात आहे. झारंखंडमधला हा जिल्हा. इथे पहिल्यापासूनच गरिबी पाचवीला पुजलेली आहे. जिकडे पहाल तिकडे झोपड्या दिसतात. त्यातच येथे मंडल नावाचे कुंटुब येथे राहत होते त्यातीलच दोन सख्या भावांनी ऑनलाईन फ्रॉड करण्याची ही टेक्निक शोधून काढली. एकाला धरून दूसरा आणि दूसऱ्याला धरून तिसरा असं करत संपुर्ण परिसर यात गुंतला.

जामतारा इफेक्ट कसा आहे…
पहिले येथे झोपड्या होत्या. परंतु इथं आत्ता हवेली उभारल्यात ८० लाखापासून एक-एक कोटीपर्यंत हवेली उभ्या केल्या आहेत. सहज एखाद्याकडचे आठ दहा लाख गोल केले जातात. एक पोरगा दिवसाला दिडशे ते दोनशे फोन करतो. दिवसाला कधी पाच दहा लाख पण मिळून जातात. त्यातूनच इथे लक्झरी गाड्या आल्यात तर हवेली बांधल्या गेल्यात. प्रत्येकजण इथं श्रीमंत आहे. विशेष म्हणजे यात असणारी सगळी पोरं ही पाचवी दहावी नापास असणारी आहेत तरी ती ऑनलाईन सेक्टरमध्ये मास्टर म्हणून ओळखली जातात.

इतकं सगळं असूनपण पोलिस कायम हतबल असतात कारण महाराष्टातील पोलिस पथक येथे जर तपासासाठी गेले तर त्यांनाच जिवाची भिती असते. कारण, अख्ख गाव पोलिसांना घेरुन ठेवतय. पोलिस तर काय करणार. म्हणजे समजा तुमचे पैसे ऑनलाईन पद्धतीने गेले. तर तुम्ही तुमच्या गावच्या पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करता. त्यानंतर तुम्हाला आलेल्या कॉलचा माग काढला जातो. तो कॉल याच जामतारा मधून आलेला असतो. पोलिस तत्पर असतीलच तर ते इथवर पोहचतात. पण, या जंगलात नेमके आरोपी कसे. ते जिथे राहतात त्या पत्यावर जावून देखील ते सापडत नाहीत. कारण अशी पोरं चोवीस तास भूमिगतच असतात. नाही म्हणायला पोलिस दारात असणाऱ्या गाड्या वगैरे जप्त करुन नेतात ! यापलीकडे काहीच होत नाही आणि होवू शकत देखील नाही.

अर्थात एका बाबतीत पोलिसांचे अभिनंदन नक्कीच करायला हवे. कारण मध्यंतरी त्यांनी अतिशय कसून शोध घेऊन व सापळे लावून तिथली एक टोळी पकडली होती. त्यावेळी शेकडो सिमकार्ड आणि कैक मोबाईल देखील जप्त केले होते. त्याकाळात या फ्रॉडस्टरवर बऱ्यापैकी आळा बसला होता !

आत्ता यापासून कस वाचायचं…
सर्वात रामबाण उपाय म्हणजे कोणत्याही परिस्थितीत आपल्या कार्डच्या डिटेल्स फोनवर कोणालाही द्यायच्या नाहीत. आत्ता एक साधा प्रश्न बॅंकेतून आपणाला फोन येतो. समोरचा तुमचं क्रेडिट /डेबिट card ब्लॉक झालेलं सांगतो आणि वरती तुमच्याकडूनच डिटेल्स घेतो. तो जर बॅंकेतून बोलत असेल त्याला तुमचं कार्ड ब्लॉक झालेलं माहिती असेल तर त्याला कार्डचा नंबर देखील माहिती असायला हवां. पण सहसा आपल्याला असे प्रश्न पडत नाहीत. बॅंकेतून आहे म्हणल्यानंतर आपण सहज गोष्टी सांगून टाकतो. आणि ट्रॅप होतो. त्यामुळं कार्ड, कार्डचा नंबर, OTP सारख्या गोष्टी कोणासोबतही शेअर करु नये. इतकाच काय तो उपाय.

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!