पुणे शहरात महिलांना लक्ष करून लुटणाऱ्या सराईत महिलेसह एकाला अटक…

पुणे (संदिप कद्रे): घरकाम करणाऱ्या महिलांना लक्ष करून त्यांना काम देण्याचे बहाण्याने चहा मधून गुंगीचे औषध देवून लुटणाऱ्या सराईत गुन्हेगार महिलेस व तिच्या साथीदारास बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

सदरबाबत अधिक माहिती अशी की, १२ / ०६ / २०२४ रोजी दुपारी १२.३० वा ते रात्री १०.३० वा चे दरम्यान एका अनोळखी महिलेने भारत ज्योती बसस्टॉप बिबवेवाडी येथे फिर्यादी यांना भेटून त्यांना काम देण्याचा बहाणा करुन त्यांना लक्ष्मी रोड येथील घरी नेवून फिर्यादी यांना चहामधून गुंगीकारक पदार्थ देवून बेशुद्ध करुन त्यांचे अंगावरील सोन्याचे दागीने व मोबाईल हे जबदस्तीने काढुन घेवून त्याना फुरसुंगी येथे बेशुध्द अवस्थेत सोडून दिले. साक्षीदार महिला यांना सुध्दा अनोळखी महिलेने काम देते असे सांगून स्कुटीवरून घरी नेवून चहा मधून गुंगीकारक पदार्थ देवून त्यांचे गळयातील व कानातील सोन्याचे दागिने काढून घेवून त्यांना कर्वेनगर पुणे येथे बेशुध्द अवस्थेत सोडून दिले. याबाबत फिर्यादी यांनी नमुद अनोळखी महिलेविरूध्द तक्रार दिलेने बिबवेवाडी पोलिस ठाणे गुन्हा रजि. १५४ / २०२४ भा.दं.वि.सं. कलम ३२८, ३९२, ३६३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दाखल गुन्हयातील अनोळखी महिला आरोपीचा वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर व पोलिस निरीक्षक गुन्हे मनोजकुमार लोंढे यांचे मार्गदर्शनाखाली तपासपथक प्रमुख सहा. पोलिस निरीक्षक प्रविण काळुखे, तपासपथकातील अमंलदार यांनी गुन्हयाचे घटना ठिकाणापासून ते अनोळखी आरोपी गेलेल्या मार्गावरील अंदाजे ५०
ते ६० सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून तांत्रिक विश्लेषणाचे मदतीने आरोपी
१) सुषमा बाळासो भोसले रा. माळेगाव बुद्रूक बारामती जि. पुणे.
२) विकास वासूदेव पाठक, वय ५८ वर्षे रा. एलआयसी स्टाफ क्वार्टर गणेशखिंड रोड मॉडेल कॉलनी शिवाजीनगर पुणे. (मुळ- नाईकवडी प्लॉट परांडा रोड, बार्शी) यांना निष्पन्न करून तपास करता त्यांनी दिनांक १२/०६/२०२४ रोजी फिर्यादी यांना काम देण्याचा बहाण करून आरोपी विकास पाठक याचे घरी नेवून त्यांना गुंगीचे औषध देवून त्यांचे अंगावरील दागिने व मोबाईल काढून घेवून त्यांना दोघांनी वरील नमुद मोपेड गाडीवरून बेशुध्द अवस्थेत फुरसुंगी येथे सोडून दिले व यातील साक्षीदार आशा मळेकर यांना १०/०६/२०२४ रोजी नमुद आरोपी महिलेने त्यांना काम देण्याचे बहाण्याने त्यांना घरी नेवून त्यांना गुंगीचे औषध देवून त्यांचे अंगावरील दागिने व मोबाईल काढून घेवून त्यांना दोघांनी वरील नमुद मोपेड गाडीवरून बेशुध्द अवस्थेत कर्वेनगर पुणे येथे सोडून दिले. नमुद दोन्ही आरोपीकडे तपास करून गुन्हयातील २,०४,०००/-रूपये किमंतीचे सोन्याचे दागिने, मोटर सायकल, मोबाईल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणलेला आहे. वरीलप्रमाणे कोणासोबत प्रकार घडला असलेस त्यांनी बिबवेवाडी पोलिस ठाणेस संपर्क करावा. दाखल गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलिस निरीक्षक प्रविण काळुखे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलिस आयुक्त प्रविण पवार, अप्पर पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उप आयुक्त आर राजा, परिमंडळ ५ पुणे शहर, सहा. पोलिस आयुक्त गणेश इंगळे, वानवडी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर, पोलिस निरीक्षक गुन्हे मनोजकुमार लोंढे, तपासपथकाचे प्रभारी अधिकारी सहा. पोलिस निरीक्षक श्री प्रविण काळुखे, पोलिस हवालदार संजय गायकवाड, शाम लोहोमकर, संतोष जाधव, पोलिस अमंलदार शिवाजी येवले, प्रणय पाटील, विशाल जाधव, आशिष गायकवाड, ज्योतिष काळे, अभिषेक धुमाळ, मेघा गायकवाड यांनी केली आहे.

पुणे शहरात पुन्हा अल्पवयीन मुलाकडून अपघात; टँकरनं अनेकांना उडवले…

पुणे पोर्श अपघात प्रकरणात देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं ए टू झेड…

पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याचा राग; मुलाच्या वडिलांनाच संपवले…

पुणे शहरात कोयता गँगने धुमाकूळ घालत केली वाहनांची तोडफोड…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!