मुंबई पोलिस दलात तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती; गृह खात्याचा निर्णय…

मुंबईः मुंबई पोलिस दलात तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह खात्याने घेतला आहे. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीने जास्तीत जास्त 11 महिन्यांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांकडे मनुष्यबळाची तीव्र टंचाई असून, नवीन भरती होईपर्यंत पोलिस आयुक्तांच्या विनंतीवरून गृह विभागाने हा निर्णय घेतला आहे. या कंत्राटी पोलिसांच्या पगारासाठी 30 कोटी रुपये खर्चासही सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे.

मुंबई पोलिस दलात कंत्राटी भरती केली जाणार आहे. मनुष्यबळाची टंचाई असल्याने तब्बल 3 हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह खात्याच्या वतीने घेण्यात आला आहे. मुंबई पोलिस दलात सध्या मनुष्यबळाची टंचाई असून नवी भरती प्रक्रिया होईपर्यंत कंत्राटी भरती करण्यासंदर्भात पोलिस आयुक्तांनी विनंती केली होती. मुंबई पोलिस आयुक्तांच्या विनंतीनंतर गृह विभागाने कंत्राटी भरती करण्यासंदर्भातील निर्णय घेतला आहे. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीने जास्तीत जास्त 11 महिन्यांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. कंत्राटी पद्धतीने भरती झालेल्या पोलिसांच्या पगारासाठी तब्बल 30 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

गणेशोत्सव झाला असला तरीदेखील नवरात्रोत्सव, रमजान, दिवाळी अशा सणासुदीच्या काळात मुंबईत बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलिसांची गरज भासते. याच पार्श्वभूमीवर राज्य सुरक्षा महामंडळांच्या जवानांतून मुंबई पोलिस दलात कंत्राटी भरती केली जाणार आहे. 11 महिने किंवा भरती होण्यापर्यंतचा कालावधी यातील जो कमी कलावधी असेल तेवढ्या काळापुरती ही भरती राहणार आहे. मुंबई पोलिस दलातील कंत्राट संपलं की, सुरक्षा महामंडळाचे जवान पुन्हा आपल्या पूर्वीच्या सेवेत रूजू होतील. यासाठी 100 कोटी 21 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, पोलिसांच्या पगारासाठी 30 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मुंबई पोलिस दलातील कंत्राटी भरतीचे वृत्त गृह विभागाने फेटाळले…

मुंबई पोलिसांच्या नावे बनावट फेसबुक प्रोफाईल अन् पैसे…

मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा फोन…

मुंबईत होणार कंत्राटी पोलिसांची भरती; सरकारच्या निर्णयाला विरोध…

पोलिस दलात SPचे अधिकार आणि कार्य काय? पगार किती; घ्या जाणून…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!