पुणे स्टेशनवर मोबाईल चोरणारा आला अन् सापळ्यात अडकला…

पुणे (संदीप कद्रे): एक व्यक्ती चोरीतील मोबाईल विकायला गावी जाण्यासाठी निघाला असून, तो पुणे स्टेशन येथे आल्याचे समजल्यानंतर लोहमार्ग पोलिस ठाणेच्या डीबी पथकाने त्यास सापळा रचून पकडले. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून २० मोबाईल जप्त केले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

लोहमार्ग पोलिस ठाणेच्या डीबी पथकास खास बातमीदाराकडून खबर मिळाली की, एक व्यक्ती चोरीतील मोबाईल विकण्याकरिता गावी जाण्यासाठी पुणे स्टेशन येथे आला आहे. खबर मिळताच पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. धर्मेंद्र लालबिहारी साह (वय २४ वर्षे, राह. दांडेकर पुल, पुणे. मूळ राह. मजफरपुर, बिहार) असे त्याचे नाव आहे. त्याची दोन पंचा करवी झडती घेता त्याचेजवळ वेगवेगळ्या कंपनीचे २० मोबाईल फोन २,८२,०००/- रु. किमतीचे मिळून आले ते जप्त केले आहेत. जप्त मोबाईलचे मालकांचा शोध घेण्याचे काम चालू आहे.

सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधिक्षक गणेश शिंदे, उप विभागीय पोलिस अधिकारी देवीकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र गायकवाड, पोलिस निरीक्षक वासनिक, सपोनि झोडगे यांचे मार्गदर्शनाने पो. हवा. १०५१ कदम, पो. हवा. १२६१ दांगट, पोहवा ९४५ टेके , पो. हवा. ११२२ कांबळे, पो.हवा. ६५ बोरणारे, पो. ना. ५७ बिडकर, पो. शि. २०२ मधे, पो. शि. ११५ केंद्रे, पो. शि. २०० केंद्रे या टीमने केलेली आहे.

पुणे शहरात आरोपी नशा भागविण्यासाठी करायचा मोबाईल चोरी; 32 मोबाईल हस्तगत…

पुणे शहरात मोबाईल चोरांना पकडण्यात मुंढवा पोलिसांना यश…

हडपसर पोलिसांकडून परप्रांतीय टोळी गजाआड, लाखो रुपयांचे मोबाईल जप्त…

लष्करी अधिकारी म्हणून वावरणारा पुणे रेल्वे स्थानकावर जेरबंद…

स्वारगेट पोलिसांनी मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्यांना केले जेरबंद…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!