पोलिसकाकाने घेतला जगाचा निरोप; कुटुंबियांना धक्का…

मुंबई : मुंबईच्या नागपाडा पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या पोलिसाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कैलास टेकवडे असे आत्महत्या केलेल्या पोलिसाचे नाव आहे. या घटनेमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शिवाय, पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.

‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

अर्नाळ्यामध्ये राहणाऱ्या कैलास टेकवडे यांनी त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केली. दोन ते तीन दिवसांपासून त्यांचा संपर्क होत नव्हता, त्यामुळे वरळीमध्ये राहणारे त्यांचे भाऊ आणि मुलगी यांनी अर्नाळा यथील घर गेले. या दोघांना कैलास टेकवडे यांच्या अर्नाळ्याच्या घराचा दरवाजा बंद दिसला. दरवाजा उघडल्यानंतर कैलास यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत त्यांना दिसल्यावर धक्का बसला. कैलास टेकवडे यांचा मृतदेह दिसल्यानंतर लगचेच त्यांच्या भावाने पोलिसात धाव घेतली. यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.

कैलास टेकवडे हे मागच्या 25 वर्षांपासून मुंबई पोलिस दलात कार्यरत आहेत. मागच्या पाच वर्षांपासून ते एकटेच अर्नाळ्याच्या घरात राहत होते. त्यांची पत्नी आणि मुलगी पाच वर्षांपासून त्यांच्यासोबत राहत नव्हत्या, अशी माहिती समोर आली आहे. कैलास टेकवडे यांच्या घरामध्ये कोणतीही चिठ्ठी आढळली नाही, त्यामुळे पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

पोलिसांच्या गाडीला ट्रकने दिली धडक; पोलिसकाकाचा मृत्यू…

पोलिसकाकाची घराजवळच गोळ्या झाडून निर्घृण हत्या…

पोलिसकाकाचा नाईट ड्युटीवरुन घरी जाताना भीषण अपघातात मृत्यू…

पोलिसकाकाने नातेवाईक महिलेसमोर झालेल्या मारहाणीमुळे केली आत्महत्या…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!