
ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी सुरू केल्या घरफोड्या अन्…
छत्रपती संभाजीनगर : एका आरोपीने ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यासाठी वीस घडफोड्या केल्याची माहिती पुढे आली आहे. प्रवीण सुभाष पाटील असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यामधील कंकराळा आणि आमखेडा येथे भर दिवसा 3 घरे फोडून रोख रकमेसह 10 लाख 66 हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात प्रवीण सुभाष पाटील याला अटक करण्यात आली होती. पोलीस चौकशीमध्ये त्याने ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यासाठी वीस घडफोड्या केल्याचे सांगितले.
पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!
आरोपी प्रवीण पाटील याने जळगाव जिल्ह्यात तब्बल 20 ठिकाणी घरफोड्या केल्या आहेत. त्यातून जो पैसे आला त्या पैशांमधून आरोपीने ग्रामपंचायतची निवडणूक लढवल्याची माहिती पोलीस चौकशीमध्ये समोर आली आहे. दरम्यान हा आरोपी अट्टल घरफोड्या असून, त्यावर जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरफोड्या केल्याचे गुन्हे दाखल आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये कंपनीला भीषण आग; सहा कामगारांसह श्वानाचा मृत्यू…
धक्कादायक! छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोरच केली आत्महत्या…
छत्रपती संभाजीनगर हादरलं! अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार…
बदला! 14 वर्षांनंतर तोच दिवस अन् तीच वेळ…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

