
बोपदेव घटनेतील आरोपींनी सापडू नये म्हणून कशी केली पोलिसांची दिशाभूल पाहा…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहराजवळ असलेल्या बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार प्रकरणातील तीन आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर चोरीचे गुन्हे याआधी दाखल झालेले आहेत. त्यातील एकावर बलात्काराचा गुन्हा देखील दाखल आहे. युवतीवर सामुहिक बलात्कार केल्यानंतर कुठल्याही सीसीटीव्हीमध्ये ते सापडू नयेत यासाठी त्यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे.
बोपदेव घाटामध्ये 21 वर्षीय तरूणीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील एका संशयित आरोपीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर इतर दोन आरोपींना नागपुरातून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. ताब्यात घेतलेल्यांची सखोल चौकशी सुरु आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली आहे.
कोंढवा भागात अनेक वेगवेगळ्या रस्त्यांनी त्यांनी ट्रीपल सीट प्रवास केला. जेणेकरुन सीसीटीव्हीची साखळी तुटावी. मात्र, पोलिसांना तपास करताना कोंढवा भागातील एका व्यक्तीने या तिघांना ट्रीपल सीट फिरताना पाहिल्याचे सांगितले. पोलिसांनी त्या दिशेने तपास केला आणि पुण्याजवळील ग्रामीण भागातून एकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरु केली आणि या गुन्ह्याचा उलगडा झाला. त्याच्या दोन साथिदारांकडे देखील चौकशी सुरु आहे.
आरोपी गुन्हा करण्यापूर्वी एका वाईन शॉपमध्ये दारू घेण्यासाठी एकत्र आल्याचे एक सीसाटीव्ही फुटेज पोलिसांच्या तपासात समोर आले होते. या फुटेजमध्ये पीडितेच्या मित्राने आरोपींना ओळखले आणि त्याआधारे ही कारवाई करण्यात आली आहे. अख्तर, सोम्या आणि चंद्रशेखर अशी या तिन्ही आरोपींची नावे आहेत. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी या आरोपींनी 20 किमी अंतरासाठी 80 किमीपेक्षा जास्त प्रवास केला.
बोपदेव प्रकरणातले तीनही आरोपी हे मध्य प्रदेशचे असून मागच्या काही वर्षांपासून पुण्यात कचरा वेचण्याचं काम करतात. बोपदेव घाटातल्या घटनेच्या रात्री तिन्ही आरोपींनी येवलेवाडीतल्या बिअर शॉपमधून बिअर विकत घेतली होती. बिअर प्यायल्यानंतर तिन्ही आरोपी बोपदेव घाटात गेले आणि पीडित मुलीवर अत्याचार केले. तरुणीवर अत्याचार केल्यानंतर ते बोपदेव घाटातून खाली उतरले. घाट उतरल्यानंतर तिन्ही आरोपी खेड शिवापूरला गेले. पोलिसांना चकवा देण्यासाठी तिघांनी वेगळा मार्ग घेतला आणि ते रात्रभर फिरत राहिले. या दरम्यानच्या काळात त्यांनी मोबाईलचाही वापर केला नाही. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी आर्टिफिशिअल इंटलिजन्सचा वापर केला, तसेच 700 ठिकाणचे सीसीटीव्हीही पोलिसांनी तपासले.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांच्या 60 टीम पोलिसांनी तयार केल्या होत्या. मात्र घटनेच्या 9 दिवसानंतरही आरोपी मोकाट असल्याने पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. त्यामुळे सगळीकडून या घटनेचा आणि पोलिसांच्या तपासावर संताप व्यक्त केला जात होता. आरोपींचे स्केच तयार केले आहेत. शिवाय आरोपीची माहिती देणाऱ्याला 10 लाखाचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. आतापर्यंत रेकॉर्डवरील 400 गुन्हेगारांची झाडझडती घेण्यात आली आहे.
या प्रकरणातील संशयित आरोपीचे स्केच कोंढवा पोलिस स्टेशनने प्रसिध्द केले होते. याबाबत काही माहिती मिळाल्यास खालील त्वरित संपर्क साधावा असे पोलिसांनी आवाहन केले होते.
मोठी बातमी! बोपदेव घाटात सामूहिक अत्याचार करणारे तिन्ही नराधम पोलिसांच्या ताब्यात…
बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती…
पुणे! बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कातील आरोपी CCTVमध्ये कैद…
बोपदेव घाट प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार; शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी केली घटनेची पाहणी…
पुणे शहरातील बोपदेव घाटात गँगरेप करणाऱ्या आरोपींचे स्केज जारी; संपर्क…
पुणे शहरातील बोपदेव घाटात युवतीबाबत काय घडलं? पोलिसांनी सांगितली ए टू झेड स्टोरी…
पुणे हादरले! मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला युवतीवर सामूहिक बलात्कार…
पुणे शहरात दोन चिमुकल्या मुलींवर स्कुल बस ड्रायव्हरकडून लैंगिक अत्याचार…
पुणे शहरात महाविद्यालयीन युवतीवर चौघांकडून अत्याचार…
पुणे जिल्ह्यातील दोन मैत्रिणी मित्राच्या खोलीवर गेल्या अन् दारु पाजून अत्याचार…
पुणे शहरात 85 वर्षीय वृद्ध महिलेवर 23 वर्षीय नराधमाने केला बलात्कार…
पुणे हादरलं! आईच्या प्रियकराचे अल्पवयीन मुलीसोबत संतापजनक कृत्य…
रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!

