
पोलिस दलात खळबळ! पोलिस अधिकाऱ्याला लाच घेताना पकडलं रंगेहात…
पुणे : भावाविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या एका पोलिस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
गुन्ह्यात कमी शिक्षेचे कलम लावून जामीनासाठी मदत करणे आणि न्यायालयात आरोपपत्र लवकर दाखल करण्याच्या मोबदल्यात हा लाचेचा सौदा सुरू होता. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. नाथा रामकिसन केकाण (वय ३८, रा. रावेत) असे अटक करण्यात आलेल्या भ्रष्ट पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. त्याच्याविरोधात लोणावळा शहर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार (ACB Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
View this post on Instagram
तळेगाव दाभाडे येथील एका बांधकाम व्यावसायिकाने याप्रकरणी तक्रार दिली आहे. तक्रारदाराच्या भावाविरोधात लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि तपासात सवलत देण्यासाठी उपनिरीक्षक नाथा रामकिसन केकाण याने २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या प्रकाराची तक्रार मिळाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. सोमवारी लोणावळ्यातील मॅप्रो गार्डन परिसरातील फूड कोर्टच्या पार्किंगसमोर रस्त्यालगत हा लाचेचा व्यवहार सुरू असताना एसीबीच्या पथकाने कारवाई केली आणि उपनिरीक्षकाला लाच घेताना रंगेहात पकडले. या धडक कारवाईमुळे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहे.
पोलिस अधिकाऱ्याला लाच घेताला रंगेहात पडकले, थेट बेड्या…
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील लाचखोर उपनिरीक्षकाच्या घरात मिळालं घबाड…
पोलिस दलात खळबळ! लाचखोर एपीआय, पीएसआयसह तिघांवर गुन्हा दाखल…
साताऱ्यात लाच घेणाऱ्या न्यायाधीश प्रकरणात नवा ट्विस्ट, पोलिस अधिकारी…
लाचखोर पोलिस निरीक्षकाच्या घरात सापडलं मोठं घबाड…

