पंढरपूरमध्ये पोलिस उपनिरीक्षकाचा हल्ल्यात मृत्यू…

पंढरपूर : पंढरपूरमध्ये हल्ल्यात पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. सूरज विष्णू चंदनशिवे (वय 42) असे हल्ल्यात मृत्यू झालेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सांगोला तालुक्यातील वासूद परिसरात बुधवारी (ता. २) रात्री ही घटना घडली. बुधवारी रात्री जेवण केल्यानंतर शतपावली करण्यासाठी सूरज हे आपल्या घरापासून थोडं दूर गेले होते. केदारवाडी रस्त्यावर ते शतपावली करत होते. यावेळी तिथे दबा धरुन बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे.

शतपावली करुन बराचवेळ उलटला तरी सूरज हे घरी आले नाहीत म्हणून कुटुंबियांनी शोध घेतला असता लासूद केदारवाडीजवळ पोलिस उपनिरीक्षक केदार यांचा मृतदेह आढळून आला आहे. कुटुंबियांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. सूरज यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी सांगोला ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. या प्रकरणी अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे शहरात पोलिस अधिकाऱ्याने पत्नी आणि पुतण्याची हत्या करत संपवलं जीवन…

पुणे शहरातील पोलिसकाकाची आत्महत्या; चिठ्ठीमध्ये लिहीले की…

येरवडामधील जेल कर्मचाऱ्याची प्रेमसंबंधातून आत्महत्या; गुन्हा दाखल…

धक्कादायक! वरिष्ठ IPS अधिकारी विजयकुमार यांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!